खोपोलीतील पाताळगंगा नदीत दोन चिमुरडया सख्या बहिणींचा बुड़ुन मृत्यू, खोपोलीकर हळहळले

Share Now

875 Views

खोपोली (प्रविण जाधव) खोपोली येथील पाताळगंगा नदीत दोन चिमुरडया सख्या बहिणींचा बुड़ुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सॊमवारी सायंकाळी घडली. रोमा व प्रगती ह्या दोन चिमुकल्या आपल्या भावासहित नदीच्या पात्रालगत खेळात होत्या. खेळता खेळता त्या दोघीही नदीच्या पात्रात उतरल्या आणि पाण्याच्या खोलीत जाऊन प्रवाहासोबत वाहून गेल्या. हे दिसताच भावाने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ त्यापाठोपाठ अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी धावून आले.

खोपोलीत मुलगाव येथून दोन लहान मूली पातालगंगा नदीमधे वाहून गेल्याची घटना घडली. त्या दोघिनाही शोधण्यात बचाव करणाऱ्याना यश आले. पण त्या दोन्ही चिमुकल्याचा यात दुर्दैवी अंत झाला. त्या दोघी संख्या बहिनी असून एकीचे तीन वर्षे तर दुसरीचे पाच वर्ष आहे. मिळालेल्या माहितीं नुसार रोमा व प्रगती या दोघी बहिनी आपल्या आई वडिलांसह पुण्याहुन खोपोलीत राहणाऱ्या वडिलांचे मामा यांचे कड़े आल्या होत्या. सांयकाली त्या पातालगंगा नदीवर आंघोळीस गेल्या होत्या. पाण्यात खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही चिमुकल्या पाण्यात वाहून गेल्या. तेथे एकच आरडा ओरडा होताच त्यांचा शोध सुरु झाला.

अग्निशमन दल व अपघात ग्रसतांच्या मदतीला ग्रुपचे सदस्य पोलिसांसह शोध मोहिमेत सामील झाले व काही वेळातच दोघिना ही वाहत जाताना पण्याबाहेर काढण्यात आले व पार्वती हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आले. दोघिंपैकी एकीचा आधीच मृत्यु झाला होता तर दूसरी ला वाचवन्याचे डॉक्टरांनी प्रयत्न केले पण दुर्दैव दूसरी ची ही प्राणजोत तेथे मालवली, रोमा व प्रगती च्या आई वडिलांच्या आर्त रडन्याने होप्सिटल परिसरात वातावरण सुन्न झालय होते. पोलिसांनी त्वरित त्या दोन्ही चिमुकल्याणचे शव शवविच्छेदन साठी पाठवून दिले. दरम्यान, चिमुकल्यांच्या मृत्यूने सर्वच खोपोलीकर अक्षरशः गलबलून गेले. तर या घटनेने नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या चिमुकल्यांकडे पालकांने लक्ष द्यावे हेच या घटनेतून अभिप्रेत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.