अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून अेाळखला जाणार्या मेढे विभागातील भिसे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय गांधी निराधार योजनेचे विद्यमान सदस्य रघूनाथ करंजे(गुरुजी) यांच्या स्नुषा स्वाती प्रविण करंजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी सरपंच सुप्रिया ठमके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मावळते उपसरपंच तानाजी जाधव यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी हि निवडणूक घेण्यात आली.उपसरपंच पदासाठी स्वाती प्रविण करंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच सुप्रिया ठमके, मावळते उपसरपंच तानाजी जाधव,प्रशांत करंजे,अनामिका ठमके,वेदिका मते,नयना करंजे,ग्रामसेविका रोशनी निळेकर यांनी उपस्थिती दर्शविली.उपसरपंच स्वाती करंजे यांची निवड विधानपरिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या आदेशानुसार सर्व सदस्यांनी एकमतानी केली.
यावेळी पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडप्रक्रियेसाठी रोहा तालुका युवक कार्याध्यक्ष मयुर खैरे,सरपंच सुप्रिया ठमके,चंद्रकांत बा. ठमके, तानाजी जाधव, हेमंत करंजे, हरिश्चंद्र ठमके,भगवान करंजे,विलास ठमके, प्रविण करंजे, मोतीराम ठमके, भगवान गोवर्धने,दिनेश घरट,शरद गोवर्धने, मदन जाधव, सचिन करंजे, राजेवाडी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.