माथेरान ( दिनेश सुतार ) आंतरराष्ट्रीय T २० क्रिकेट चा फीवर शिगेला पोहोचलेला असताना युवकां पाठोपाठ क्रिकेटच्या जगतात आता रायगड जिल्ह्यातील २२ वर्षीय युवतींसाठी देखील रायगड प्रिमियर लीग च्या माध्यमातून मोठे दालन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी कोलाड येथील एम डी एन फ्यूचर स्कूलच्या मैदानावर दि. १० रोजी महीला RPL ची निवड चाचणी यशस्वीपणे संपन्न झाली.
यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील लेदर (सिझन) बॉलवर वेगवेगळ्या ॲकेडमीच्या माध्यमातून खेळणार्या जवळपास ४५ युवतींनी या निवड चाचणीत सहभाग नोंदविला होता. या निवड चाचणीचा शुभारंभ एम. डी.एन.फ्युचर स्कूल कार्यकारी प्रमुख देवेंद्र चांदगावकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. रायगड प्रिमीयर लीग २२ ट्राफिचे राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असुन ही स्पर्धा खेळविण्यासाठी मुलींकडुन कोणतीही फी आकारली जाणार नसून फक्त नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगत सदर स्पर्धा सिडको बेलापुर येथील मैदानावर येत्या काही दिवसात निवड झालेल्या मुलींमध्ये चार संघात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या १५ ते २० मुलींना रायगड संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवून देण्यासाठी तसेच दर रविवारी मुंबई येथे सामने खेळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रायगड प्रिमियर लीगचे सेक्रेटरी जयंत नाईक यांनी RPL घ्या वतीने स्पष्ट केले.
रायगड प्रिमियर लीगच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रयत्न करत असलेल्या राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित पालकांकडून भरभरून कौतुक होत असुन रायगड प्रिमियर लीगच्या उपक्रमाला भरभरून यश येवो अशा देखील शुभेच्छा दिल्यात.याप्रसंगी रायगड प्रिमीयर लीगचे सदस्य संदीप जोशी, महेंद्र भातिकरे, सुरेंद्र भातिकरे, चंद्रशेखर सावंत,शंकर दळवी प्रशिक्षक उमाशंकर,सागर सावंत, ऋषिकेश कर्णुक,विक्की भोईर तसेच बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता.