मतभेद बाजुला सारुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा : माजी मंत्री रविशेठ पाटील

Share Now

637 Views

रोहा (रविंद्र कान्हेकर) सन २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून एक युतीचा उमेदवार म्हणून पेण विधानसभा मतदार संघात माझे नाव घेण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळखंडात मी आघाडीचा उमेदवार असताना सुद्धा माझ्यावर अन्याय झाला आहे. या मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांनाही काही कारणास्तव माझ्यापासून जाणून बुजून दूर करण्यात आले. याचा फटका गेल्या दहा वर्षात मला सहन करावा लागला. आघाडीबरोबर असतानाही इतर उमेदवार माझ्यासमोर उभे करून माझे मताधिक्य कमी करण्यात आले. त्यामुळेच आज मला युतीबरोबर जाणेच भाग पडले आहे. म्हणूनच मी या भागात पुन्हा एकदा आपल्या कामाचं झंझावत चालू ठेवला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी न करता आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरता आपला विजय होईल याकरिता कामाला लागा असे आवाहन माजीमंत्री रवीशेठ पाटील यांनी रोह्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

पेण विधानसभा मतदार संघात 2004 च्या निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवत रविशेठ पाटील यांनी राजकारणात आपला चांगला ठसा उमटवला होता. त्यांची ही कामगिरी पाहता आघाडी सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्री तसेच कॅबिनेटमंत्री पद मिळाले होते. आदिवासी विकास विभागाचे ते मंत्री असताना त्यांनी रायगडातील आदिवासी बांधवांना खावटि वाटप केले. याशिवाय शासनाच्या विविध रोजगारभिमुख योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या या कार्याचा झंजावात असाच पुढे चालू होता. पेण विधानसभा मतदार संघातील मतदारांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले होते. मात्र 2009 व 2014 च्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली आणि रविशेठ यांना सत्तेपासून बाजुला व्हावे लागले. मात्र कामाची उमेद आणि शेवटच्या माणसापर्यंत जाण्याची ताकद आजही कायम ठेवत पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पेण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व आता सत्ताधारी भाजप पक्षामार्फत करणार असल्याने कार्यकर्त्याचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी रोहा तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकीसाठी मतभेद बाजुला सारुन कामाला लागा असे आवाहन त्यानी यावेळी रविशेठ यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी तानाजी देशमुख, संजय देशमुख, मोरेश्वर कोल्हटकर, सुनिल देशमुख, गजानन मालुसरे, सुरेश वाघमारे, नाना देशमुख, संतोष देशमुख, आनंद लाड, सुरेश जैन, राजेश डाके, नितीन वारंगे, अरुण वाघमारे, लहू वाघमारे, शशिकांत कोळी, गणपत वाघमारे यांच्यासह पिंगाळसई विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेण विधानसभा मतदार संघात रविशेठ पाटील मंत्री असताना या मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत असे विधान गावागावात भेटिगाठी घेताना कार्यकर्ते रविशेठ पाटील यांना म्हणाले. गेले दहा वर्षात या मतदार संघात पाहिजे तसा विकास झाला नाही अशी खंत कर्यकर्त्यानी व्यक्त केली. येत्या विधानसभा निवडणूकात आम्ही विभागातील कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन यावेळी कर्यकर्त्यानी रविशेठ पाटील यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *