मुसळधार पावसाने कुंडलिकेला पूर, रोहयात सर्वत्र पाणीच पाणी, नगरपरिषदेचे नियोजन कोलमडले !

Share Now

1,863 Views

रोहा ( प्रतिनिधी) तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग केली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रोहा वरसे यांसह परिसरात चक्काजाम केले. रोहा शहरातील ठिकठिकाणी साठलेल्या पाण्याने सबंध नागरिकांची त्रेधात्रिपाट उडाली. रोहा, वरसेत सर्वत्र पाणीच पाणी झाले. जंगल पट्टयात झालेल्या मुसळधार पावसाने कुंडलिकेला अंशतः पूर आले. दुसरीकडे काही तास झालेल्या पावसाने रोहा अष्टमी नगरपरिषद प्रशासनाची अक्षरशः फजिती केली. शहरात जंगल भागातून आलेल्या पाण्याला नदीकडे जाण्यासाठी वाट न मिळाल्याने नेहमीप्रमाणे दमखाडी, मिराज हॉटेल, पंचायत समिती रोहा, मेहेंदळे विद्यालय, बोरीची गल्ली, रोहा तलाठी कार्यालय भागात तुफ़ान पाणी साठले आणि नगरपरिषदेच्या नियोजनाचा भलताच धज्जा उडाल्याचे चित्र समोर आले.

शुक्रवारी पहाटेपासून रोहा यांसह ग्रामीणात मुसळधार पाऊस झाला. कुंडलिका नदी, उपनदया, ओहल, नाल्यांना पूर आला. निवी जंगल पट्टयातून मुसळधार पाणी दरवर्षीप्रमाणे वरसे हद्दीत शिरले. एकतानगर, ध्रुव हॉस्पिटल, सातमुशी नाला व इतरत्र ठिकाणी पावसाच्या पाण्याने नागरिकांची पलता भुई थोड़ी केली. चक्काजाम केला. निवी, भुवनेश्वरलगत कालव्याचे पाणी उलटल्याने आणीबाणीचे दृश्य पाहायला मिळाले. याउलट रोहा शहरात विकासाची कामे सुरु आहेत, त्या कामाच्या नावाखाली जागोजागी रस्ते फोडले, त्यातील बहुतांश रस्ते अद्याप खड्यात गेले. खोदलेले रस्ते त्यावर पाण्याने अतिक्रमण केल्याने शालेय विद्यार्थी, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागले आहे. तर दमखाडी नाका मिराज हॉटेलसमोर, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, पंचायत समितीच्या रस्त्यावर तीनचार फुट पाणी साचल्याने हेच का विकासकामे ? असा संतप्त सवाल रोहेकरांनी केला आहे. सकाळी अकराच्या सुमारास अनेक वस्तीत पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली, मात्र काही वेळ पाऊस थांबल्याने लोकांच्या लाखोल्यातून नगरपरिषद प्रशासन सद्यस्थितीत वाचले. तर रानातले पाणी जाण्यासाठी न.पा.चे गटार दोन फुटाचे ? त्यामुळे स्थिती फारच विदारक पाहायल मिळाली.

शुक्रवारी काही तासात झालेल्या मुसळधार पावसाने कुंडलिका गंगा नदी दुथडी वाहू लागली. शुक्रवारी रात्रौ अधिक पाऊस पडल्यास शहरातील अनेक वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाल्याचे सांगण्यात आले. तरीही अचानक आलेले पावसाने रोहा व परिसरात आनंदून गेला. शेतीच्या कामांना अधिक वेग येणार असल्याचे चित्र स्पष्ठ झाले. आता मुसळधार पाऊस किती बॅटिंग करतो, सर्वच प्रशासनाची किती झोप उडवतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसाने रोहा अष्टमी नगरपरिषद प्रशासनाला मोठी चपराक दिली हे अधोरेखित झाले आहे. तर नगरपरिषदेची नाले सफाई व युद्धपातळीवरील विकासकामे सबंध रोहेकरांसाठी पहिल्याच पावसात डोकेदुखी ठरली असेच नागरिकांतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *