श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक सपन्न !

Share Now

705 Views

कर्जत (जयेश जाधव) श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल नवी मुंबई येथे विदयार्थी परिषदेची निवडणूक प. पू. श्री योगेश्वरदास स्वामी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार न घडता सुनियोजित पद्धतीने पार पडली. श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यापैकी एक म्हणजे विद्यार्थी परिषदेची होणारी निवडणूक. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक राष्ट्र, भारतीय संविधान व संसद यांची माहिती मिळावी. व लोकसभा, राज्य सभा, विधानसभा यांचे कार्य प्रत्यक्षिकातून शिकायला मिळावे यासाठी विदयार्थी परिषदेची निवडणूक घेऊन विद्यार्थ्यांचे प्रतिनिधींची निवड करण्यात येते.

सदर पार पडलेली विद्यार्थी परिषदेची निवडणूक प्रक्रीया ही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पाडण्यात आली. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी विद्यार्थी उमेदवारांनी प्रथम उमेदवार अर्ज भरून नंतर निवडणूक चिन्हाची निवड करून आपला प्रचार करून खऱ्या मतदान प्रक्रियेप्रमाणे बोटाला शाही लावत निवडणूक पार पडली. यावेळी विद्यालयाच्या शिक्षकांनी मतदान प्रतिनिधींची भूमिका पार पाडली. सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून मतदान करण्याचे फायदे व दुर्लक्ष केल्यास होणारे दुष्परिणाम या संदर्भातील महत्व पटवून देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले. लोकशाही प्रक्रिया समजावून सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन ही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प. पू. आत्मस्वरूपदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य जॉन्सन यांच्या नियोजनाप्रमाणे शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *