पुनाडे धरण येथे स्वच्छता अभियान.

Share Now

177 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने व स्वच्छता विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक 29/5/2022 रोजी सकाळी 7:30 ते 11 या वेळेत उरण तालुक्यातील पूनाडे धरण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक, माधव म्हात्रे, पुनाडे येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव ठाकूर, खजिनदार सुरज पवार,सचिव प्रेम म्हात्रे, अभय पाटील, साहिल म्हात्रे, संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, सुविध म्हात्रे, सागर घरत, शुभम ठाकूर, कुमार ठाकूर, समीर पाटील, प्रणय पाटील, आकाश पवार, संपेश पाटील, प्रणित पाटील, हेमंत ठाकूर, प्रकाश म्हात्रे, सुमित कोळी, पार्थ कोळी, मित कोळी आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

यावेळी पुनाडे धरण परिसरात आंबट शौकीन तसेच दारूचे पार्टी करणाऱ्यांनी दारूच्या बाटल्या फोडून सर्वत्र टाकून दिले होते. तसेच पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्याही मोठ्या प्रमाणात येथे आढळून आले. सदर दारूच्या बाटल्या, फोडलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, आदी कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी 200 हुन जास्त नामांकित ब्रँडेड अशा दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजात तळागाळात जाऊन संस्था काम करते. कोणतेही स्वार्थ न बाळगता सामाजिक बांधिलकी जपत संस्था विविध उपक्रम राबवित असते. पुनाडे धरणा वरील स्वच्छता अभियान हा या उपक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमातून दारू पिणारे, पार्टी करणारे यांनी येथे दारूच्या बाटल्या, पिण्याचे प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकू नये, स्वछता पाळावी यासाठी या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार सुधीर मुंबईकर, सुनिल वर्तक यांनी सांगितले. पार्टी करणाऱ्यांनी येथे परिसरात कचरा, घाण करू नये अशीही विनंती यावेळी त्यांनी केली.सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर ठाकूर यांनी अपघाताची कारणे, अपघातापासून बचाव तसेच स्वरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकंदरीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *