रोह्यातील महा ई सेवा केंद्रानी जनतेची लूट थांबवावी,अन्यथा जनसेवा संघर्ष प्रतिष्ठानचा आंदोलनाचा ईशारा…

Share Now

475 Views

रोहा ( अक्षय जाधव ) रोहा तालुक्यातील महा ई सेवा केंद्रामध्ये नागरिकांचचीं होत असणारी आर्थिक* पिळवणुकीबाबत आज दिनांक ६ जून रोजी नायब तहसिलदारांना जनसेवा संघर्ष प्रतिष्ठानाकडून निवेदन देण्यात आले.

नागरिकांना सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी काही वर्षांपूर्वी सरकारने महा ई-सेवा केंद्र सुरु केली, परंतु रोहा तालुक्यात असलेली इ-सेवा केंद्र अक्षरशा जनतेची लूट करत आहेत. रोह्यातील महा ई-सेवा केंद्रातुन आधारकार्ड, पॅनकार्ड,उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, सात-बारा, आठ अ, रेशनकार्ड दुरुस्ती, रेशनकार्ड काढणे जन्म-मृत्यूचा दाखला, किंवा ओळ्खपत्रांची दुरुस्ती इत्यादीसाठी कमीत कमी दीडशे रुपयांपासून अधिकाधिक हजारांच्या घरात पैसे सांगून लूट केली जात आहे असा आरोप जनसेवा संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीप वायडेकर यांनी केला आहे. “माझे कोणीही काहीही करू शकत नाही”,या अविर्भावात मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात आहेत. यामुळे ई- सेवा केंद्रे लोकांच्या सोयीसाठी नसून पैसे गोळा करणारे अनअधिकृत अड्डे बनले आहेत, असा सार्वत्रिक आरोप जनतेकडून होत आहे असे अर्जात नमूद केले आहे. या अधिक नागरिकांना महा-ई सेवा केंद्रामध्ये नीट वागूणक दिली जात नाही, त्यानी दिलेल्या पैश्याची योग्य पावती सुद्धा दिली जात नाही,मनमानी पद्धतीने पैसे घेतले जातात‍, एकही दाखला सरकारच्या निर्धारित दराप्रमाणे मिळत नाही. ह्या मुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ह्याची दखल जनसेवा संघर्ष प्रतिष्ठान नि घेऊन आज रोहा तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदारांनी ह्या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन. नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवावी, ,जे अश्या प्रकारे पिळवूनक करतात. त्याचवार कारवाई करावी. आणि सर्व ई-सेवा केंद्रांची बैठक घेऊन, योग्य तो सरकारी दर निश्चित करून, त्या दराची प्रत प्रत्येक ई- सेवा केंद्राच्या बाहेर लावण्याची सक्ती करवी अशी मागणी संस्थेने अर्जाच्या मार्फत व्यक्त केली आहे. नागरिकांची राजरोस होणारी पिळवणूक थांबवावी, अशी विनंती पत्राच्या मार्फत करण्यात आली आहे. ह्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीप चंद्रकांत वायडेकर, स्वरूप पाटील, कनैया पडवळ, अथर्व मोरे, अजित बिन, सुरज कोळी, सामी डबीर हे अधिक सदस्य उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *