नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीची रंगीत तलिम मध्ये श्रीवर्धन स्थानिक प्रशासन यशस्वी

Share Now

813 Views

श्रीवर्धन ( मकसुद नजीरी ) नगरपरिषद मार्फत जे. सी. बी. १२ मिनिटात तर अग्निशमन वाहन १८ मिनिटात घटनास्थळी केले दाखल, मागील वर्षी पावसाळ्या मध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले होते.जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी तसेच पुराचा धोका निर्माण झाला होता. अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. यामध्ये प्रशासनाने खूप मोठे मोलाचे कार्य केले होते. आगामी काळात येणाऱ्या पावसाळ्या मध्ये जिल्ह्यांमध्ये कोणतीही नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन हे सज्जन असायला पाहिजे यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कडून प्रत्येक ठिकाणी रंगीत तालीमचे आयोजन करण्यात येत आहे.

या निमित्ताने श्रीवर्धन येथिल लांबे पेट्रोल पंपाच्या जवळ दरड कोसळली असल्याचे स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले होते. तालुका प्रशासनाकडू क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी कसे लवकर पोहोचता येईल. यासाठी प्रयत्न केले. श्रीवर्धन नगरपरिषद मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याकडून आपल्या कार्यालयातील असलेल्या जे सी बी. १२ मिनिटात तर अग्निशमन वाहन. १८ मिनिटांत घटनास्थळी उपलब्ध करून दिले. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे जे. सी. बी आणि अग्निशमन वाहन यांना पोहोचण्यात थोडा विलंब झाला नाहीतर अजून लवकर पोचू शकले असते. यावेळी तालुका प्रशासनातले अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळेस चाललेल्या प्रशासनाच्या धावपळी मुळे परिसरातील नागरिक मोठ्या संम्रर्भात होते. शासनाकडून पावसाळ्यापूर्वी रंगीत तालीम असल्याचे. समजताच जनतेमध्ये असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *