खोपोली ( संतोषी म्हात्रे) खालापुरातील बीडखुर्द गावातील भानुदास हरिचद्रं पाटील यांच्या घराला रात्रीमध्यान अचानक आग लागली. त्या भीषण आगीत घर पूर्ण जळुन खाक झाल्याची घटना घडली. घरातील भानुदास पाटील रात्र पाळीला कामावर गेल्याने बचावले, घरात तीन व्यक्ती झोपल्या होत्या. त्यापैकी मुलगी स्नेहा पाटील १९ हीने जळक्या घरातुन वरच्या मजल्यावरुन उडी मारल्याने बचावली. परंतु सनिल कर्णुक पाटील मुलगा व रजंना भानुदास कर्णुक पाटील हे मात्र अचानक अद्याप बेपत्ता असल्याने त्यांना शोधण्याचे शोध मोहीम सुरु असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित व्यक्ती नेमके कसे बेपत्ता झाले ? याबाबत चिंता व्यक्त झाली आहे.
गावातील युवक व पुरुष मडंळी मदतीला धावून जात मदत कार्य केले. खोपोली अग्नीशमन दल दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. लाकडी घर जळुन खाक झाल्याने, तसेच सिलेडंर स्फोटामुळे अतंर्गत भितीं पडल्याले मोठ्या प्रमाणात जळलेला मलबा बाहेर काढण्यात आला. बेपत्ता व्यक्ती रजंना कर्णुक ही खालापूर तालुका शिवसेना संघटक संतोष भोईर यांची बहीण आहे. सपुर्ण घर जळुन खाक, विट न विट बाजुला काढली तरीही सनिल व रजंना कर्णुक अद्यापही बेपत्ता असल्याने आता घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच खालापूर उप विभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली या अपघातातून बचावलेलली मुलगी तिला काहीच खरचटले नसून दोन माणसं अद्याप गायब असल्याने तसेच पूर्ण पडलेल्या घराची वीट वीट शोधूनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने या घटनेत घातपात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवित आहे. तर त्या दिशेने त्यांचा तपास सुरू आहे यावर अधिक बोलण्यास पोलीस नकार देत असून बीड व परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे
बेपत्ता आई आणि मुलगा हे खालापूर कर्जत मतदारसंघाचे संघटक संतोष भोईर यांची बहीण आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे व विविध पक्षाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होत भानुदास यांचे सांत्वन केले. खालापूर तहसिलदार ईरेश चप्पलवार यांनीही घटनास्थळी दाखल होत घराचे मालक भानुदास यांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला बीड व परिसरात घर जळण्याची व घर जळून खाक होण्याची ही पहिलीच घटना असून त्यामध्ये 2 जण बेपत्ता होण्याची परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे अधिक तपास खालापुर उप विभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे