कल्याण येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

Share Now

931 Views

मुरुड जंजिरा (संतोष हिरवे) दिनांक १७ जुलै २०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी कल्याण शहर तर्फे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व भव्य पक्ष प्रवेश सोहळा के. डी.रेसिडेन्सी, बारावे गाव रोड, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला. ह्या शिबिरात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी चे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.डॉ.सुरेश माने सर यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बहुजन चळवळी चे महत्त्व, सध्याची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने प्रशिक्षित होवून एक सक्षम कार्यकर्ता कसे बनावे आणि चळवळ पुढे कशी नेता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन केले. तीन तासाच्या ह्या प्रशिक्षण शिबिरात सर्वांनी यातून बोध घ्यावा आणि एकत्रित येऊन मिशनरी पॉलिटिक्स हाच पर्याय निवडून सत्तेत येऊन बहुजन समाजाची चळवळ सतत पुढे नेत जावी असे ही सांगितले.

शिबिरात कल्याण, उल्हासनगर, ठाणे, पालघर, रायगड, जळगाव, शहापूर येथून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते. रमाबाई ब्रिगेड महिला संघटना च्या संस्थापिका मा.ज्योतीताई गायकवाड ही हजर होत्या. सोबत त्यांचे पती, समाजसेवक मा.सत्यकाम पवार ही उपस्थित होते. मा.सत्यकाम पवार यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये आपल्या ६० सहकाऱ्यांसोबत जाहीररीत्या प्रवेश केला व त्यांची ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले.
सदर शिबिरात उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी खालील प्रमाणे

मा.सतीश बनसोडे (महाराष्ट्र प्रदेश सचिव)
मा.नंदिनिताई साळवे (ठाणे जिल्हाध्यक्षा – महिला आघाडी)
मा.मंगलभाऊ पाठारे (कल्याण शहर अध्यक्ष)
मा.ललितकुमार तायडे (कल्याण शहर अध्यक्ष – युवा आघाडी)
पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *