स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये गणित सप्ताह संपन्न

Share Now

653 Views

कर्जत ( जयेश जाधव) श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये नुकताच सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता गणित सप्ताह – उद्घाटन सोहळा मा. प्राचार्य जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. गणित हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असून त्याशिवाय जगणे अशक्य होते. परंतू दुर्दैवाने फार कमी लोकांना गणित हा आवडीचा विषय ठरतो. अनेक विद्यार्थ्यांना गणित अवघड जात असल्याने ते गणिताकडे कानाडोळा करतात.

परिणामी भविष्यात अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच गणित विषयाची भीती मनातून कायमची निघून जावी व गणित हा गमतीशीर वाटावा, हसत खेळत गणिताचे अध्ययन व्हावे यासाठी दरवर्षी विद्यालयात गणित सप्ताह साजरा करण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम, प्रकल्प, खेळ, कलाकुसर यांच्या माध्यमातून गणिताचे अध्यापन केले जाते व संकल्पना दृढ करण्यावर भर दिला जातो. यावेळी सप्ताहात विद्यार्थ्याकडून शालेय तसेच सहशालेय उपक्रम करवून घेण्यात येणार आहे. तसेच प्रश्नमंजुषा, गणिती शोध यांसारख्या उपक्रमातून त्यांच्या बुद्धीला चालना दिली जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल, नवी मुंबई गणित अध्यापक मंडळाचे सदस्य श्रीकांत देवकर यांच्या नियोजनाप्रमाणे. राहुल कृष्णा, पूनम चौहान आदी गणित शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *