रोहा भाटे वाचनालयात तब्ब्ल 8 लाख 43 हजार 811 रुपयांचा अपहार, ऑडिट रिपोर्ट हाती

Share Now

1,023 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा भाटे सार्वजनिक वाचनालयात अपहार झाल्याचे अखेर समोर आले. नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता संस्थेचे ऑडिट रिपोर्ट हाती आले. त्यानुसार रोहा भाटे वाचनालयात तब्ब्ल 8 लाख 43 हजार 811 रुपयांचा मोठा अपहार केल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब झाले. रोहा अष्टमी सिटीझंस फोरमने बुधवारी बैठक बोलावली होती. यावेळी हा सर्व घटनाक्रम पाहता सदर अपहार संगनमताने झाल्याचे संशय व्यक्त होत असल्याने सिटीझंस फोरमच्या वतीने पोलिसांत वेगळी तक्रार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

सप्टेंबर 2018 पासुन या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरु होती, संचालक मंडळाने याकाळावधीत संबंधितांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. अखेर गावातील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवीत संचालक मंडळास धारेवर धरले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबत रोहा अष्टमी सिटीझंस फोरमची बैठक निमंत्रक आप्पा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये भाटे वाचनालयाचे करण्यात आलेले ऑडिट रिपोर्ट पदाधिकारी यांनी पोलिसांत अद्याप दिलेले नाही, ते देणे. वाचनालयातील विविध घटनाक्रम पाहता, हा सर्व गैरव्यवहार संशयास्पद तसेच संगनमताने झाले असल्याचे दिसून येत असल्याने फोरमच्यावतीने पोलिसांकडे वेगळी तक्रार देण्यात आली होती.

वाचनालयातून तसेच मा. जिल्हा सहकारी संस्था निबंधक यांच्याकडुन विविध कागदपत्रे मिळविणे. मागील तीन वर्षांत हॉल वापरासाठी दिलेल्या तारखा आणि संस्थेला भाडयापोटी आलेल्या रक्कमांचे तपशील मागवून घेणे, त्याची तपासणी करणे. काही स्वार्थी प्रवृत्तींनी वाचनालयात आपली संस्थाने थाटण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरणाऱ्या शेकडो वाचकांचे वार्षिक तसेच अजिवन सभासदत्व रद्द केले होते. व या संस्थेतील सर्व गैरप्रकार पाहता रोहेकर वाचक वर्ग येथे सभासद होण्यास निरुत्साही दिसून येत. तरी सर्व भूतपूर्व सभासदांची माहिती घेऊन, त्यांनी भाटे वाचनालयात पुन्हा सक्रिय व्हावे, त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील तरुण तसेच नवोदित वाचकांनी सभासद व्हावेत, यासाठी संपर्क जाहीर आवाहन करने आदी महत्त्वाचे विषयांवर याबैठकी निर्णय घेण्यात आले. या बैठकीस श्रीनिवास वडके, नितिन परब, संजय कोनकर, श्रीकांत ओक, दिलीप वडके, महेश सरदार, विजय देसाई, राजेंद्र जाधव, सतिश साठे, विनोद पटेल, आशिष स्वामी, सागर जैन आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *