चोंढी येथे अमली पदार्थ सेवन विरुद्ध जनजागृती दिन साजरा.

Share Now

550 Views

अलिबाग ( वार्ताहर ) दरवर्षी 26 जुन हा अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. या वर्षी आरोग्य संचालनालयाच्या निर्देशानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सदर दिना संबंधी जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे असल्याने समाजातील वेगवेगळ्या स्तरावर जाऊन जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम व मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यक्रम हे दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत घ्यावे असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. म्हणूनच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय रायगड यांच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय येथे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चोंढी येथील सदाशिव वडके विद्यालय येथील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना आज DMHP रायगड अंतर्गत “व्यसनमुक्ती, अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम तसेच मानसिक आरोग्याचे महत्व” या विषयावर प्रफुल्ला कांबळे (क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट) आणि धनेश्वरी गोयर ( समाजसेवा अधीक्षक-मनोविकृती ) यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच व्यसनमुक्त राहण्याची शपथ देखील दिली. यापुढे देखील दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत अलिबाग तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *