चणेरा येथे आढळली म्यानाबाहेर तलवार, तर्कवितर्कला उधाण

Share Now

1,167 Views

रोहा (राजेंद्र जाधव) तालुक्यातील चणेरा येथे रस्त्याच्या कडेला म्यानाबाहेर पडलेली तलवार आढळून आल्याने विभागात तर्कवितर्कला प्रचंड उधाण आले आहे. हमरस्त्याच्या कडेला तलवार कोणी फेकली का, अडीचतीन फूट असलेली तलवार रस्त्याच्या कडेला कोणी ठेवली असावी, तलवार ठेवण्यामागचे नक्की उद्देश काय ? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित झाला आहे. दरम्यान, चणेरात म्यानासहीत म्यानाबाहेर तलवार आढळून आल्याने ग्रामस्थ मुख्यतः शालेय विद्यार्थ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

रोहा चणेरा राज्यमहामार्गावरील चणेरा हद्दीतील पुलालगत रस्त्याच्या कडेला शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांना तलवार दिसून आली. म्यानाबाहेर शेजारी पडलेली नंगी तलवार दिसताच ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले. तलवारीबाबत चणेराचे पोलीस पाटील गिरीश विचारे, बिट हवालदार गदमळे यांना तातडीने ग्रामस्थांनी माहिती दिली. तलवारीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तुषार पारवे यांनी पंचनामा करून तलवार ताब्यात घेतली असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

चणेरा येथिल पुलावर सापडलेल्या तलवार घटनेशेजारी विद्यालय असल्याने विद्यार्थी भयभीत झाले. रस्त्याच्या कडेला तलवार आढळण्यामागे नेमके गौडबंगाल काय, तलवार कोणी फेकली की तलवार कडेला ठेवण्यामागे आणखी काही उद्देश होता ? याचा तपास रोहा पोलीस करीत आहेत. लवकरच तलवार घटनेच्या तपासातून नेमके काय बाहेर येते ? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, चणेरा येथे आढळून आलेली तलवार कोणत्या धातूची आहे. तलवारीची म्यान पाहता तलवार कधीची असू शकते ? याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *