धाटाव येथील डीएमसी कंपनीत देशाचा 75 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा 

Share Now

251 Views

रोहा (वार्ताहर) १५ ऑगस्ट २०२२ देशाचा ७५ वा अमृतमहोत्सवी दिन संपूर्ण देशात सांस्कृतिक व देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा झाला. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील डीएमसी कंपनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भारत स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला. 

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ८.१५ वा. कंपनीच्या प्रगणांत सेवानिवृत्त फौजी ज्ञानेश्वर देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कंपनीचे अरुण माने, राकेश खांडेकर, निलेश शेडगे यांनी देशभक्तीपर गीते गायली.  यावेळी कंपनीचे सेफ्टी मॅनेजर अरुण माने यांनी देशभक्ती विषयी मनोगत व्यक्त केले. त्या नंतर कंपनीत वर्ष भरात सेफ्टी वीक मध्ये कामगार कर्मचारी व त्यांचा मुलांनसाठी आयोजित केलेल्या फेअर ड्रिल, निबंध, स्लोगन, चित्रकला, रांगोळी इत्यादी विविध स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थीनीचा कंपनीचे मेंटनेस मॅनेजर दीपक पाटील व इतर विभागातील मॅनेजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरहु कार्यक्रमाचे नियोजन कंपनीचे सेफ्टी मॅनेजर अरुण माने यांनी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संभाजीराव जाधव यांच्या मागदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्सनल विभागाचे केतन पवार, अरुण दळवी, राकेश खांडेकर, अनिकेत पाटील यांनी विशेष सहकार्य केले. सर्व कामगार व कर्मचारी यांचा उपस्थितीत कंपनीत 75 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *