वावेदिवाळी इंदापुर ( गौतम जाधव ) कोकणचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता पनवेल इंदापुर ते लागपाले चौवपदरी करण रस्ता हा गेल्या १० ते १२ वर्षे रखडलेला असून पावसाळ्यात या रस्त्याची फार दयानिय अवस्था दरवर्षी होत असून या वर्षीतर या माहामार्गाची फारच बिकट अवस्था झाली आहे. यावर्षी गणेश उत्सव काही दिवसावर आँगस्ट महिन्यातच येत असून लाखोच्या संखेने कोकणात गणेश भक्त या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असतात आशा या गणेश भक्ताना या वर्षी देखील कोकणात प्रवास करताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा सामना करून आपले गाव गाठून गणरायच्या दर्शनाला जायच आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जून महिन्यापासून एवढे मोठ मोठे खड्डे पडले असून दरवर्षी या रस्त्यावर अने वाहणाचे अपघात होऊन अनेक कूंटूबाती प्रवासी जखमी होतो तर काहींना आपले जीव गमवावे लागत आहे. कोकणात अनेक केंद्रित मंञी, राज्य मंञी, खासदार, आमदार झाले परंतु हा राष्ट्रीय महामार्ग त्यांना अद्याप करता आला नाही या नेत्यांनी फक्त राष्ट्रीय महामार्गाचे राजकारण केले आहे. वडखळ, नागोठने,कोलाड,इंदापुर,माणगांव,लोणेर पर्यंत तर खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डा हेच समजत नाही नदि नाळ्याल्या प्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याची डबकी भरलेले दिसत आहेत तसेच या मोठ मोठ्या पडलेल्या खड्डा मुले सर्व सामान्य प्रवाश्यांच्या वाहानाचे देखील फार मोठे नुकसान होत आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे ठेकेदार माञ मजेत गाड्या घेवून फिरत असून त्यांच्यावर धाक माञ ठेवणारा लोक प्रतिनिधीच आज राहीला नाही.
लोक प्रतिनिधी फक्त केंद्रीय मंञी किवा राज्य मंञी हा रायगड माणगांव कोकणच्या एक दिवसी दाव-यावर येत असेल तर हेच स्थानिक मंञी, खासदार, आमदार, नँशनल हायवे किवा सार्वजनिक बाधकाम खाते असेल किवा राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार असतील त्यांना सांगून लाखो कोटी रूपये उपलब्ध करून. एका दिवासाठी ते राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे भरून टकाटक तसेच नेत्याचा हँलिकँपटर उतराय हँलिपँड देखील एकदिवसातच करतात जणूकाही महामार्ग टकाटकच आहे. याना सर्वसामान्य जनतेची काही पडलेली नाही. म्हणूनच आज कोकणातील गोवा राष्ट्रीय महामार्ग व मंञी खासदार आमदार सर्व ओके मध्ये असून सर्वसामान्य जनता माञ धोके मे आहे.