सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन, कोविड योद्धा, नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणारे व आजी माजी सैनिकांचा मानपत्र देऊन केला सन्मान

Share Now

371 Views

पोलादपूर (अमिर तारलेकर ) पोलादपूर तालुक्यातील सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून आज अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलादपूर पंचायत समितीचे सह गटविकास अधिकारी हंबीर साहेब व विस्तार अधिकारी शिंदे साहेब उपस्थित होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धा, नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणारे व आजी माजी सैनिक, शिक्षक व पत्रकार यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे, व्यासपीठावर मंडळ अधिकारी राठोड, तलाठी वंदना गिमेकर, सवाद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा गुडबाडकर, उपसरपंच मेहजबीन तारलेकर, दत्तात्रेय उतेकर सर, प्रशांत तुलसुळकर सर, दिपक जाधव सर,उमेश कालेकर,यासिन करबेलकर,मुजम्मिल तांबे, माजी सरपंच रशिदा तारलेकर, नम्रता पाटेकर,किसन चाचले, आशा खेडेकर,नामदेव पाटेकर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामसेवक व्ही बी वानखेडे, शिपाई शशांक जंगम, भाई गुडबाडकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई तारलेकर व दिपक जाधव सर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *