रायगड जिल्हयातील महिला परिचर यांचे प्रलंबित मागण्यांकरीता जिल्हा परिषद कार्यालय समोर धरणे आंदोलन ..

Share Now

446 Views

अलिबाग ( अमूलकुमार जैन ) रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांच्या विविध अडचणी आणो समस्यांबाबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा अडचणी आणि समस्या न सुटल्यामुळे रायगड जिल्हा महिला परिचर महासंघ यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या समोर एक दिवशीय धरणे आंदोलन छेडले आहे. रायगड जिल्हयातील महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) महिला परिचर यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत प्रशासना कडे यापुर्वी वेळो वेळी निवेदन सादर केले आहे. मात्र त्यांच्या मागण्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. सर्वात तळातील कर्मचारी असलेल्या महिला परिचर भगिनी खेडयापाडयातुन कोणतीही सुविधा नसताना, तुटपुंजा मानधनावर आरोग्य विभागातील नेमुन दिलेले काम तसेच रुग्णसेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. म्हणून नाईलाजाने आज दिनांक २३/०८/२०२२ रोजी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन जिल्हा महिला परिचर संघटनेने केले. मी पो महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) यांच्या प्रमुख मागण्या मध्ये महिन्याच्या महिन्याला व वेळेत मानधन मिळत नाही. या बाबत प्रत्येक महिन्याला तालुका स्तरावर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे खेटे मारावे लागत आहेत. अनेक वेळा फोन केल्यानंतर किंवा फेऱ्या मारल्यानंतर आम्हाला 5 ते 6 महिन्यानंतर मानधन दिले जाते ते सुध्दा पुर्ण मिळत नाही. या बाबत आपण स्वत: लक्ष घालुन दरमहिन्याच्या 5 तारखेपर्यंत मानधन नियमित मिळावे या करीता संबधीत अधिकारी यांना आदेश दयावेत, महिला परिचर यांना किमान वेतन रू. 18000/- मिळावे.,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणे बाबत… कोरोनाविषाणू प्रादुर्भाव काळात गावागावातुन विविध सर्व्हे करणे, रुग्णांना औषधे पोहोचविणे, घरोघरी जावून कोरोना रुग्णांबाबत माहिती मिळविणे, अलगीकरण / विलगी करणातील रुग्णांना मदत करणे अशी अनेक कामे महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) यांनी कोणतीही सुरक्षा साधने नसताना केली आहेत. मात्र शासनाने जाहिर केलेला प्रोत्साहनपर भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही. सदरचा भत्ता जिल्हा परिषद सेस फंडामधून देण्यात यावा.

या बाबत काही जिल्हयात अंमलबजावणी करण्यात आलेली असुन काही जिल्हयात कोवीड काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यात आला आहे. सोबत माहितीसाठी गडचिरोली, सांगली, नागपूर आदी जिल्हयाचे पत्राची प्रत जोडली आहे.,गणवेश, छत्री, टॉर्च, बूट इत्यादी साहित्याचा पुरवठा करण्याबाबत.,सरकारी कर्मचारी यांचे प्रमाणे पेन्शन मिळावी . विमा कवच मिळावे.सर्व महिला परिचर यांना लसीकरण, सर्व्हे करणे, अनेक साथ रोगातील कुटुंबांना घरापर्यंत जाऊन मदत करणे अशी अनेक कामे आम्हाला करावी लागतात मात्र या करीता सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही गोष्टी दिल्या जात नाहीत. गाव पातळीवरील आरोग्य विभागातील कर्मचारी यांना शासनाकडून गणवेश दिला जातो. मात्र महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) यांना गणवेश किंवा गणवेश भत्ता दिला जात नाही.तरी आम्हाला गणवेश, छत्री, टॉर्च, बूट इत्यादी वस्तू मिळाव्यात. (जिल्हा परिषद सेस फंडामधून या करीता तरतूद करणे अपेक्षीत आहे. ) महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात गणवेश दिला जात आहे. वरील प्रमाणे प्रमुख प्रलंबित मागण्या व अडचणी असुन सदर मागण्यांमध्ये आपल्या स्तरावर करावयाची कार्यवाही करुन न्याय दयावा. या बाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्यामुळे जिल्हयातील सर्व महिला परिचर ( अर्धवेळ स्त्री परिचारीका ) दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन केले.

या आंदोलनाला रायगड जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद. कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने सक्रीय सहभाग व पाठींबा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व महिला परिचर संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष ललिता दिवेकर, सरचिटणीस रेश्मा ठाकूर, तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, महिला परिचर संघटनेच्या अश्विनी म्हात्रे, शोभा भगत, शैलजा भोईर, हर्षदा खारकर, मिनाक्षी पाटील, प्रणाली मोहिते, इत्यादी महिला परिचर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *