मुरुड ( संतोष हिरवे ) म्हसळा येथील कोंकण उन्नती मित्र मंडळाच्या वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना त्यांनी विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करावीत तसेच उद्योगशीलता वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी याउद्देशाने राहुरी कृषी विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वीत अळिंबी संशोधन प्रकल्प ,कृषी महाविद्यालय पुणे , व्ही.आर.अँग्रो फार्म तळवडे यांच्या सहकार्याने तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. मुश्ताक साहेब अंतुले, विश्वस्त सचिव मा.श्री.अशोक तळवटकर साहेब सीडीसी सदस्य मा.श्री. फजलसाहेब हळदे,मा.श्री.महादेव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनस्पती शास्र विभागाच्या प्रा. सौ.सलमा नजिरी, प्रा.एस.सी.समेळ,प्रा.के एस.भोसले,प्रा. हालोर यांच्या प्रयत्नातून वनस्पती शास्र विभाग ,अर्थशास्र विभाग, वर्कशॉप समिती यांच्या सहकार्याने महाविद्यालयात” मशरुम (धिंगरी) अंळबी लागवड प्रशिक्षण” वर्गाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाविद्यालयातील अनुसुचित जातीचे ३९ विद्यार्थी आणि विविध गावातील ११ शेतकरी सहभागी झाले होते .कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीच्या मान्यवर सदस्या श्रीमती निलम विनोद वेटकोळी यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन कार्यक्रमात मोहीते संचालक व्ही.आर.अँग्रो फार्म यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना मशरुम या कृषीपुरक उत्पादनाला आजच्या जगात असलेली मागणी आणि मशरुम शेतीमधुन मिळणारे वार्षिक उत्पन्न याबाबत प्रशिक्षणार्थ्यानां माहिती देताना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे उद्योजक बनाअसे आवाहन केले.
त्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.श्री.के.एस.भोसले.यांनी शासन अनुसूचित जाती जमातीसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते त्याचा लाभ समाजातील लोकांनी घ्यावा आणि आपली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती साध्य करावी असे सांगितले त्यानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. बी.बी.चिरमे , कवक शास्रज्ञ अंळबी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे.यांनी दृकश्राव्य माध्यमाच्या साह्याने अंळबी म्हणजे काय? त्याचे एकुण प्रकार किती? मानवाला,खाण्यासाठी योग्य असणाऱ्या अंळबीचे प्रकार कोणते? जगात कोणत्या देशात अंळबीचा अधिकाधिक उपभोग घेतला जातो? अळंबी शाकाहारी आहे कि मांसाहारी? याबाबत माहिती देऊन अंळबीची लागवड कशी करावी? तयार झालेली अंळबी कशी काढावी? आणि अळंबीच्या विक्रीसाठी कोणकोणत्या पध्दती वापराव्यात? याबाबत शास्रीय आणि हसतखेळत माहिती सांगितली तर दुपारच्या सत्रात डॉ.ए.सी.जाधव, कवक शास्रज्ञ अखिल भारतीय समन्वित अंळबी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय पुणे. यांनी प्रत्यक्ष अळंबीची लागवड कशी करावी? याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला अंळबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे सुमारे २००० ते २५००रुपये किमतीचे आणि १०० लिटर.क्षमतेचा प्लँस्टीक पाण्याचा ड्रम,स्पाँन,प्लँस्टीक पिशव्या,हँड स्प्रेअर,वर्मो हायग्रोमीटर,नाँयलाँन हँगर,सँग बँग या वस्तुचा समावेश असलेल्या किटसचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.डि.ए.टेकळे यांनी महाविद्यालयात पहिल्यांदाच दोन वनस्पती शास्रज्ञ भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि कोकणातील वातावरण पोषक असल्यानेअळंबी लागवड व्यवसाय विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सुरू करावा आणि त्यामधुन भरपूर उत्पादन आणि उत्पन्न प्राप्त करावे असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी भौतिकशास्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र होलार यांनी सर्वाचे आभार मानले.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस.सी.समेळ यांनी कार्यशाळेचे संयोजन आणि सूत्रसंचालन केले. महाविद्यालयात आयोजित केलेल्या या प्रशिक्षण वर्गाबाबत महाविद्यालय विकास समिती सर्व सदस्य ,प्रभारी प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.