वावेदिवाळी इंदापुर ( गौतम जाधव ) निजामपूर विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत असलेली योजना ही आ.भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली असल्याचे वक्तव्य मागील दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले होते. त्याकरिता निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी गुरूवार दि.२५ ऑगस्ट रोजी निजामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन प्रमोद घोसाळकर यांच्यावर सडकुंन टीका करताना ते म्हणाले की घोसाळकरांनी कोणत्याही योजनेचा अभ्यास करूनच बोलावे त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये त्यांना प्रशासकीय अनुभव असून सुध्दा ते असे वक्तव्य करीत आहेत.
जलजीवन मिशन योजना ही खा.सुनिल तटकरे व आ. आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सहा महिन्या पूर्वी मंजूर झाली असून प्रमोद घोसाळकर हे लोंकाची दिशाभूल करीत आहेत. प्रमोद घोसाळकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते.तसेच ते शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष देखील होते, तसेच ते ठाकरेच्या शिवसेनेत परत गेले.आणि लगेच ते शिंदे गटात सामील झाले त्याचे भाऊ माञ उधवजी ठाकरेच्या शिवसेना पक्षा बरोबरच ठाम आहेत.
यावेळी राजाभाऊ रणपिसे याणि पुढे बोलताना सांगितले की जलजीवन मिशनचे काम पुण्यातील एका संस्थेला देण्यात आले होते.तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्याकडून कोणती कागदपत्रे देण्यात आली आहे याची सुद्धा त्यांना कोणती माहिती नसून घोसाळकर हे माञ लोकांची दिशाभूल करत आहेत असे शेवटी रणपिसे यांनी बोलताना सांगितले असून या वेळी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, निजामपूर पंचायत समिती गण अध्यक्ष घनश्याम तटकरे, माणगांव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तुकाराम सुतार हे उपस्थित होते.