जातीय द्वेषाने विद्यार्थ्यांस मारहाण करणार्‍या जालोर येथील मुख्याध्यापाकांवर कठोर कारवाईची अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेची मागणी, महाड चवदार तळे येथे आंदोलन

Share Now

241 Views

पोलादपूर (अमिर तारलेकर) राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा येथील मुख्याध्यापकाने दिनाक 20 जुलै रोजी दलित कुटुंबातील देवाराम इंद्रकुमार मेघवाल हा तिसरीत शिकणारा अवघ्या 9 वर्षाचा विद्यार्थी तहाण लागली म्हणून मुख्याध्यापकांसाठी ठेवलेल्या माठातील पाणी प्यायल्याने केवळ जातीद्वेषातून मुख्याध्यापक छैलसिह याने त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने. त्यात विद्यार्थ्यांच्या कानाजवळ व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याने दवाखान्यात दाखल केले होते परंतु गंभीर मार लागल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र बहुजन सेना आक्रमक झाली असून अखिल महाराष्ट्र बहुजन सेनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिपेश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाड चवदार तळे येथे गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले असून उपविभागीय पोलिस अधिकारी महाड या़ंना दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याबाबत अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेने निवेदन दिले आहे, यावेळेस अखिल महाराष्ट्र बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष मा दिपेशभाऊ जाधव यांच्या सोबत महाड तालुका प्रमुख दिपक साळवी, वैशाली ताई कांबळे अध्यक्ष महाड शहर, क्रांती ताई सिंग अध्यक्ष महीला महाड तालुका, शितल जाधव संघटक महीला, तृप्ती गोसावी सदस्य, सुकेश साळवी अध्यक्ष महाड शहर ,महाड तालुका कार्यध्यक्ष दिपक जाधव,नागेश मोरे,
अध्यक्ष बिरवाडी विभाग पंकज तांबे, यश तांबे,सुरज मोरे,
,राजेश गायकवाड ,अनिकेत जाधव,रोहीत सकपाळ,विवेक जंगम, संदेश धोत्रे, रविंद्र गायकवाड ( पठाण), मयुर हाटे, संस्कार सुर्वे, मिलिंद सकपाळ व सर्व कार्येकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.