ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली तर्फे आतोने तंटामुक्ती अध्यक्षपदी रवींद्र तारू बिनविरोध

Share Now

446 Views

रोहा ( रविंद्र कान्हेकर ) गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी झालेला ग्रामसभेत एकमताने ठराव घेत महिलांसह वृद्धांपर्यंत सर्वांनी एकमुखाने रविंद्र तारू यांची सतत चवथ्या वर्षी तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड केली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. मागील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी घेऊन बलाढ्य राष्ट्रवादीच्या सरपंच यांना शेकाप, शिवसेना आणि भाजप मिळवून पायउतार करून तारू यांनी चिंचवली तर्फे अतोने ग्रामपंचायतीवर मोठा इतिहास घडवून आणला. पंधरा गावांना एकत्र करून खेळीमेळीच्या वातावरणात गावांत निर्माण करून गुण्या गोविंदाने सलोखा निर्माण करणारे तारू जनमानसातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.

15 गावांत ते नेहमी संपर्कात असल्याने या गावांतील नागरिकांच्या सुख दुःखात ते नेहमी सहभागी होतात. 16 ऑगस्ट 2019 पासून आतापर्यंत तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी ते पार पडत आहेत. पुन्हा सर्वांनी एक मुखाने रवींद्र तारू यांची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड केले आहे. चिंचवली तर्फे अतोने मधील शेकडो महिला भगिनी उपस्थित राहून सर्वांनी रवींद्र तारू हेच तंटामुक्ती अध्यक्ष व्हावे असा नारा लावला होता. तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चंद्रकांत रामजी महाडिक यांनी सुचवले आणि सुरेश नारायण महाडिक यांनी अनुमोदन त्वरित दिले. अध्यक्ष पदाची निवड होता सर्वांनी स्वागत करून अभिनंदन केले. तर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *