महाड ( समिऊल्ला पठाण ) समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या गावातील राम मंदिरातून साडेचारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या राम सीता आणि लक्ष्मण यांच्या ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ येथील समर्थ भक्तांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यातील समर्थ भक्तांमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. असे असतानाच महाड तालुक्यातील समर्थ रामदासांचे कर्मभूमी श्रीक्षेत्र समर्थ रामदास पठार, संशोधक शिवथरघळ श्री गणेश नाथ महाराज संस्थान महाड यांस कडून या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
श्री गणेश नाथ महाराज संस्थान अध्यक्ष महंत अरविंदनाथ महाराज यांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. या चोरी प्रकरणांमध्ये अन्य समाजाचा यामध्ये हात असावा किंवा विदेशी यंत्रणा यामध्ये सक्रिय असावी. तसेच हिंदूच्या धर्माक्षेत्रावर केलेला हा आतंकवादी हल्ला आहे. याची योग्य वेळी महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया महंत अरविंदनाथ महाराज यांनी प्रसार माध्यमांना दिली.