नवरा झाला हैवान;पत्नीच्या डोक्यात सिलेंडर टाकल्याने सुवर्णाचा जागीच मृत्यू ; तीन मुलं झाली पोरकी

Share Now

150 Views

पेण (देवा पेरवी) पेण तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या चांदेपट्टी गावात आरोपी संजय तुकाराम दळवी याने त्याची पत्नी सुवर्णा संजय दळवी ( वय 40) हिच्या बरोबर कौटुंबिक वाद झाला असता तिच्या डोक्यात सिलेंडर टाकल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. नवराच हैवान झाल्याने व तीन मुलं पोरकी झाल्याने परिसरात दुःखाचे वातावरण आहे.

गणपती उत्सवासाठी गावी आलेले या दांपत्यामध्ये काही कारणास्तव कौटुंबिक वाद झाला. वाद हळूहळू वाढत गेल्याने रागाच्या भरात हैवान झालेला पती संजय दळवी याने त्याची पत्नी सुवर्णा हिच्या डोक्यात सिलेंडर टाकला आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आणि आई असा परिवार आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांसोबत अपघातग्रस्तांचे वाली देवदूत कल्पेश ठाकूर रुग्णवाहिका घेवून घटना स्थळी तातडीने पोहचले. मात्र नेमका भांडणाचा कारण अजून पर्यंत स्पष्ट झालेलं नसून आरोपी संजय दळवी याला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तडवी, काळे, फड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.