राजिप शाळा तळाघर आय. एस. ओ. नामांकनांसाठी गावकरी सरसावले

Share Now

222 Views

धाटाव ( जितेंद्र जाधव ) : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा तळाघर येथील शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी एक प्रयोगशील उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने शाळा आय. एस. ओ. नामांकित करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकांनी धडपड सुरू केलेली आहे. त्यांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी गावकरी सरसावले व आपल्या कष्टाची कमाईतून शाळेला निधी म्हणून किंवा अन्य सुविधा बाबत भेटवस्तू देत आहेत.

शाळा आयएसओ करण्यासाठी कार्यालयीन कामकाजाचे नियोजन, शालेय पोषण आहार सुविधा, शाळेच्या परिस्थितीत सुविधा दर्शक फळक, शाळेत दप्तर व व्यवस्थापन या बाबत विशेष नियोजन, प्रत्येक वर्गासाठी चप्पल स्टॅन्ड, परिसर अधिक शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त करणे, इमारतीची रंगरंगोटी , शाळे भोवताली ऑल कंपाऊंड, मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रत्येक झाडाचे नाम फलक असणे आवश्यक, शाळेच्या परिसरामध्ये कुंड्या यासह अन्य बाबतीत शाळेचे मुख्याध्यापक विलास सुटे, किशोर पोळेकर सर, वृषाली माली मॅडम, ज्योती महाजन मॅडम त्यांनी आयएसओ नामांकनासाठी अधिकाधिक मेहनत घेऊन उर्वरित सुविधा बाबत ते प्रयत्न करित आहेत.

तर रायगड जिल्हा परिषद शाळा तळाघर आय एस ओ नामांकनच्या वाटचाल करित असताना अर्थिक मदत म्हणून गावातील दररोज दोन ते तीन किलोमीटर तळाघर ते रोहा येथे पायी चालत जाऊन गृहिणी म्हणून काम करत असलेल्या उर्मिला टावरे यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून शाळेला 4000 रुपये देणगी स्वरूपात दिले आहेत. तसेच महेश कांबळे १२ ट्युब लाईट, राजश्री मोरे ३ घड्याळ नग तसेच टेबल क्लाँथ ,आरती बर्जे घड्याळ, मनोज शिर्के दोन सतरजी , संतोष माने दहा बैठका या सह अन्य दानशूर व्यक्तींनी मदत करण्यास सुरुवात केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *