रा.जि.प च्या नागोठणे विभागात ६ शाळा अंधारात, शासन मात्र झोपेत 

Share Now

189 Views

नागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे केंद्रात साधारणपणे १८ प्राथमिक शाळा येत असून त्यामध्ये अनेक गरीब कुटुंबातील मुले आपले शिक्षण पूर्ण करत आहे. मात्र असे जरी असले तरी सर्व शिक्षा अभियानाचा रायगड जिल्हात बट्याबोल झालेला दिसत आहे. देशाची तरुण पिढी घडायची असेल तर प्रामुख्याने शिक्षण आवश्यक आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. मात्र आता याच शिक्षणाकरीत गरीब व गरजू मुलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागोठणे रा.जि.प केंद्रात साधारणपणे १८. प्राथमिक शाळा येतात व याच शाळेत गरीब व गरजू कुटूंबातील मुले शिक्षण घेत आपले आयुष्य सुधारण्यासाठी धडपडत असतात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पालक विध्यार्थ्यांना या शाळेत शिक्षण घेण्याकरिता पाठवतात मात्र, शिक्षण घेत असताना विध्यार्थ्यांना सुख सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे या १८ शाळांन पैकी साधारण पण ६ शाळा या अद्यापही अंधारात आहेत व ज्या शाळांमध्ये मीटर आहे त्याचे बिल हे देखील शाळेचे शिक्षक च भरत आहेत. एवढी बिकट वेळ आता शासनावर आली आहे. हा प्रकार गेली अनेक वर्ष चालू असल्याचे शिक्षक सांगत आहेत मात्र वरिष्ठाच्या च्या पुढे बोलता येत नाही व विद्यार्थ्यांना अंधारात ठेवता येत नाही म्हणून आम्ही सर्व सहन करत असल्याचे शिक्षक दबक्या आवाजात सांगतात.काही शाळांमध्ये तर चक्क थकबाकी मुले मीटर देखील कडून नेले आहेत तर ते पर्यायी ग्रामपंचायत च्या मिटर चा वापर करत आहेत.

नागोठणे केंद्रत एकूण १८ शाळा येत असून त्या मध्ये एकूण ४३२ विध्यर्थी सद्या शिक्षण घेत आहेत मात्र यातील तब्बल सहा शाळा या अंधारात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील तब्बल 3 शाळा मीटर वीणा आहेत मात्र त्या डिजिटल आहेत या मध्ये एकलघर,लावेचिवाडी, भापक्याचीवाडी या शाळांचा सामावेश होतो.विशेष म्हणजे या शाळा अदिवासी बहुल भागातील आहेत व शहरी वस्ती पासून साधारण सहा ते सात कि. मी अंतरावर आहेत व येथील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करिता शिक्षण हे आवश्यक  आहे.

या १८ शाळांमध्ये साधारण ३ शाळांचे बिल हे थकीत आहे त्यामध्ये नागोठणे क्रमांक 1, निडी, पिंपळवाडी. या शाळांचा समावेश होतो. यातील साधारणपणे ३ शाळांचे बिल जिल्हा परिषदेमार्फत भरले गेले (सादिल अनुदानातून) आहे. यामध्ये जोगेश्वरी नगर नागोठणे, शेतपळस, वासगाव या शाळांचा समावेश आहे. सादिल च्या ४% अनुदानातून (जे शिक्षकांना शालेय खर्चा साठी येतात ते पळस येथील शाळेचे वीज बिल भरले जाते.

यातील लोकवर्गणीतुन नागोठणे क्रमांक १, नागोठणे कन्याशाला, मिरनागर उर्दू शाळा, निडी शाळांचा वीज भरणा करण्यात येतो व लोकवर्गानी व व्यवस्थापन समिती मार्फत नागोठणे उर्दू शाळेचा भरणा केला जातो, एकूण 2 शाळांचे बिल वेवस्थापक समिती भरते त्यामध्ये मुरवाडी, वाघळी या शाळांचे बिल हे शाळा व्यवस्थापन समिती भरते.राज्य विधानमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पयी अधिवेशनात रायगड जिल्हातील जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज खंडीत करण्यासंदर्भात शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.त्यावर अधिकची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना गाणार यांनी एका पत्राद्वारे दिली असून त्यात रायगड जिल्हातील तब्ब्ल एक हजार ५४९ शाळांची वीज खंडीत करण्यात आल्याचे म्हंटले होते.मात्र प्रशासनाचे या कडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नागोठणे केंद्रातील शाळांना सादिल रक्कम ४% देण्यात येते मात्र आता फक्त ४ ते ५ शाळांना  सद्विल रक्कम अदा करण्यात अली आहे, बाकी शाळांना वीजबिल रक्कम अदा करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याचे रोहा गट शिक्षण अधिकारी मेघना धायगुडे यांनी सांगितले. आदीवासी बांधवाना शिक्षण हा एक प्रगतीचा मूळ आधार आहे मात्र शासननाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. असे आदीवासी समाज रोहा तालुकाध्यक्ष गोविंद रामा शिद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *