इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेला रोहेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Now

63 Views

रोहा (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येणार्‍या इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत रोहा नगर परिषद सहभागी झाली आहे.
रोहा शहरात स्वच्छ भारत अभियान 2 मोहिम, इंडियन स्वच्छ्ता लीग अंतर्गत रोहा नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आली. बॅनर, पोस्टर लावून, स्वच्छता मोहिमेची रॅली काढून स्वच्छ्ता मोहिमेचा सन्देश देण्यात आला.

देशात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. यावेळी स्वच्छ रोहा सुंदर रोहाच्या माध्यमातुन रोहेकरांना स्वच्छतेचा संदेश पालिकेच्या वतीने देण्यात आला. स्वच्छ्ता मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मा.उपनगराध्यक्ष महेन्द्र दिवेकर, महेश कोल्हटकर, नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी धीरज चव्हाण, श्रीनिवास पाटील, सुधीर भगत, ओमकार भुरन, अजय गायकवाड, रुपेश पाटील, नितीन शिंदे, यांसह अनेक मान्यवर पालिकेचे अधिकारी कर्मचारी रोहेकर नागरीक उपस्थित होते. नगरपालिका हद्दीतील
प्रत्येक नागरिकांनी, बाजार पेठेतील दुकानदारांनी, पालिकेच्या घंटा गाडीत,कचरा कुंडीत, कचरा टाकून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

केंद्रे सरकारने स्वच्छतेचे आवाहन केलें आहे ,यासाठी स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली. रोहा नगर परिषदेने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रात २५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे, रोहेकर नागरीकांचा मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने दर महिन्याला स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.