रोहा : ‘बाळंतपण’ अधिकच महागले, खाजगी हॉस्पिटलमध्ये अव्वाच्या सव्वा खर्च, शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा ‘अभाव’ गरीब कुटुंबाला कोकबण रुग्णालयाचा ‘आधार’

Share Now

365 Views

रोहा ( राजेंद्र जाधव ) रोहा तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय आहे. पण आजही दर्जेदार सुविधा, विविध विभागाला तज्ञ डॉक्टर्स नाहीत. यातूनच आम्हाला गार्डन, स्मारके नकोत, चांगले हॉस्पिटल द्या अशी खासदार, आमदारांकडे वारंवार मागणी झाली. त्याकडे आजगायत कोणीच लोकप्रतिनिधी पाहत नाहीत. पर्यायाने सामान्यांना मुख्यत: बाळंतपण, अन्य आजारांसाठी खाजगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. खाजगी हॉस्पिटल महाग झाल्याने सामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे, याच भयान वास्तवात शासकीय उपजिल्हा रुग्णालयात बाळंतीणसाठी सर्वयुक्त सुविधा नाहीत, काहींना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. दुसरीकडे बाळंतपण अधिकच महागले. सामान्य बाळंतपणासाठी खाजगी डॉक्टर्स वीस ते पंचवीस हजारांची मागणी करतात, सिजेरियन साठी पन्नास साठ हजाराचा खर्च येत असल्याने सामान्यांनी करायचे काय ? असा सवाल पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. दरम्यान, बाळंतपणासाठी खाजगी दवाखान्यांत अव्वाच्या सव्वा खर्च, शासकीय रुग्णालयात योग्य उपचार, मार्गदर्शनाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाल्याने अनेक सामान्य कुटुंबांना कोकबण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे तर शासकीय रुग्णालयात दर्जेदार सुविधा, मार्गदर्शनाच्या अभावाने सामान्यजण पुन्हा चांगलेच अडचणीत आले. त्यासाठीच सबंध रोहेकरांना दर्जेदार हॉस्पिटल द्या, करोडो रुपये खर्चाचे स्मारक, गार्डन नकोत हेच पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आताही अनेक सुविधांचा अभाव आहे. सामान्य आजारांवर उपचार असले तरी इतर अनेक आजार, साथींच्या उपचारासाठी सामान्यांनाही खाजगी रुग्णालयात भर्ती व्हावे लागत आहे. रोहा तालुका, शहरातील दवाखाने फूल्ल झालेत. अव्वाच्या सव्वा उपचार खर्चाने आधीच कोरोनात कोलमडलेला रुग्ण अधिकच खच्ची होत आहे. त्यातच बाळंतपण चांगलेच महागले. सामान्य बाळंतपणासाठी वीस पंचवीस हजार आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. सिजेरियन झाल्यास पन्नास साठ हजारहून अधिक फी आकारली जाते, हे सर्वात धक्कादायक वर्षांनुवर्ष सुरू आहे. सिजेरियनसाठी अनेक कारणे तज्ञ सांगतात. आजची महिला वेदना सहन करायला तयार नसते, नातेवाईक सिजेरियन करण्यासाठी तयार होतात. दुसरीकडे काही डॉक्टर्स अव्वा सव्वासाठी सामान्य बाळंतपण अवघड म्हणत कुटुंबियांची मानसिकता बदलण्यासाठी अग्रसेर राहतात. या सर्व चर्चेत शासकीय रुग्णालयात सर्वयुक्त सुविधा व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने अनेक महिला खाजगी रुग्णालयात नोंदणी करतात, शासकीय रुग्णालयात नोंदणी असलेल्या महिलाही भीतीने अखेर खाजगी रुग्णालयात जातात. काही महिलांना खाजगी रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला मिळत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे बाळंतपण अधिकच महाग होत चालले आहे. खाजगी रुग्णालयाचा खर्च सामान्याच्या मनगुटीवर बसल्याचेही वास्तव विचार करायला लावणारे ठरत आहेत.

रोहा शासकीय उपजिल्हा रुग्णालय अनेक सामान्य बाळंतीण महिलांसाठी अडचणींचा ठरत आहे. त्यामुळे अनेक गावातील महिला कोकबन शासकीय रुग्णालयाचा आधार घेत असल्याची बाब अधिक स्पष्ट होत आहे. रोहा शहर आजूबाजूच्या गावातील बाळंतीण महिलांना कोकबन शासकीय रुग्णालय अधिक सुरक्षित व मोफत वाटत असल्याने रोहा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेमकी कशाची उणीव आहे, काहींना बाळंतपणासाठी खाजगी रुग्णालयात का भर्ती व्हावे लागते, आधी सामान्य बाळंतपण झालेल्या महिलेलाही भीतीदायक कारणे सांगून खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला का दिला जातो ? असे खुद्द रुग्णालय संबंधित व्यक्तीने सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात अद्याप पूर्ण वेळ स्त्रीरोग तज्ञ नाहीत. त्यामुळे सामान्य बाळंतपण रुग्णांची कायम ससेहोरपट सुरू आहे. खाजगी रुग्णालयात या, असा सल्ला दिलेल्या अनेक महिला अखेर शासकीय रुग्णालयात कोकबन येथे जातात, बाळंतपण सुखरूप व अगदी मोफत होत असल्याचे खुद्द महिलांनी सांगितले. जे कोकबन रुग्णालयातील डॉक्टरांना शक्य आहे, सेवाभाव जपतात, ते रोहा उपजिल्हा रुग्णालयात का होत नाही, असे आता सबंध रोहेकर खेदाने बोलत आहेत. रोह्यात सर्व सुविधायुक्त सुसज्ज शासकीय हॉस्पिटल नाही. करोडो रुपये खर्चाचे स्मारक, गार्डन सुरू आहेत. आम्हाला आधी सुसज्ज हॉस्पिटल द्या, खासदार ,आमदार आमची प्राथमिक गरज पूर्ण करा, अशी नव्याने मागणी जेष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी बाळंतपण मुद्द्यावर दिली आहे. दरम्यान, बाळंतपण खूपच महागले अशा धक्कादायक मुद्याची खासदार, आमदार आतातरी दखल घेतात का ? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.