विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू, मेढा गावावर शोककळा !

Share Now

808 Views

रोहा (प्रतिनिधी) विजेचा शॉक लागून मेढा येथील ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. नवीन घराचे साहित्य बाजूला करीत असताना लागुन असलेल्या विजेच्या वायरच्या शॉकने महेश दत्तात्रय सुर्वे हे बेशुद्ध पडले. त्यांना अधिक उपचारार्थ तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने महेश दत्तात्रय सुर्वे यांची प्राणज्योत मावळल्याचे समोर आले आणि होतकरू तरुण गेल्याने मेढा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

मेढा गावातील विठ्ठल आळीत राहणारे महेश दत्तात्रय सुर्वे यांसह दोघेजण नवीन घराचे साहित्य बाजूला करीत होते. तेथे असलेली विजेची वायर महेश यांना जबरदस्त शॉक देऊन गेली. त्यात महेश सुर्वे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तातडीने उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आणण्यात आले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी महेश सुर्वे यांस मृत घोषित केले. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.