माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात रोहा शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन, मातोश्रीवर बोलण्याची लायकी नाही ; शेडगे

Share Now

170 Views

रोहा (राजेंद्र जाधव) माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात बोलण्याला प्रारंभ केले, बोलण्याच्या नादात कदम यांनी थेट मातोश्रीवर जहरी टीका केली. कदम यांची ठाकरे कुटुंबावरील टीका राज्य यांसह अनेक जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली. रामदास कदम यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात रोहा तालुका शिवसैनिकही प्रचंड आक्रमक झाले. तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राम मारुती चौकात रामदास कदम यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. ५० खोके, माजलेत बोके, उपकारांची परतफेड करणाऱ्या गद्दारांचा निषेध असो अशा घोषणा देत शेकडो शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारले. दरम्यान, राज्यातील सत्तापालट ठाकरे शिवसेना, शिंदे गट शिवसेना नाटयानंतर रोह्यात प्रथमच शिवसेनेचे मोठे आंदोलन झाले. आंदोलनातून तालुका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत चांगल्याच उत्साह संचारल्याचे समोर आले, तर रायगड जिल्ह्यातील मुख्यतः रोहा शिवसेना अजूनही भक्कम आहे, हे उपस्थित शेकडो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

दापोली येथील कार्यक्रमात माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर आक्षेपार्ह टीका केली. त्या टीकेविरोधात रायगडातील शिवसैनिक कमालीने संतप्त झाले. महाड व अन्य तालुक्यात रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. रोहा तालुका शिवसेनेने कदम यांना जोडे मारत आंदोलन केले. यावेळी तालुकाप्रमुख समीर शेडगे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, महिला आघाडीच्या समीक्षा बामणे, युवा अधिकारी राजेश काफरे, ओंकार गुरव, आदित्य कोंडाळकर, विनायक गायकर, योगेश गायकर यांसह शहर, तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोडे मारो आंदोलनात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. ५० खोके, माजलेत बोके अशा घोषणा देत रोहा शहर अक्षरशः दणाणून सोडला. कदम यांना बहुतेक बाधा झाली आहे. त्यातून ते काहीही बरगळत आहेत. शिवसेनेने मोठमोठी पदे दिली. त्यांना मोठे केले. आता शिवसेनेच्या विरोधात बोलत परतफेड करत आहेत. रामदास कदम यांची मातोश्री विरोधात बोलण्याची लायकी नाही. शिवसैनिक त्यांना धडा शिकवणार, असा खरपूस समाचार तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी घेतला, तर कदम यांनी किमान खाल्लेल्या मिठाला जागावे, पण ज्याच्या रक्तात गद्दारी आहे, ते गद्दारच राहणार अशी संतप्त भावना शहर प्रमुख दीपक तेंडुलकर यांनी व्यक्त केली. ठाकरे शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनाने सेना अजून भक्कम आहे. हेच यातून दाखवून दिले आहे. तर हीच ठाकरे शिवसेना पुढे राजकारणात काय प्रभाव टाकते ? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.