स्व. सुरेश जनार्दन म्हात्रे यांच्या पुण्यतिथी दिनी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

Share Now

61 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य स्व. सुरेश जनार्दन म्हात्रे यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनी त्यांच्या कुटुंबियांकडून रा.जि.प्राथ. शाळा, गोवठणेच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात सतत हिरीरीने पुढे असणारे स्व.सुरेश म्हात्रे यांच्या पावलावर पावूल टाकून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्या कुटुंबियांकडून होत असते. या प्रसंगी स्व. सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र अंकित म्हात्रे, आदित्य म्हात्रे, माजी उपसरपंच लक्ष्मीकांत म्हात्रे, मिलन म्हात्रे, संतोष म्हात्रे आणि तुषार म्हात्रे आदी उपस्थित होते. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने मुख्याध्यापिका वंदना म्हात्रे आणि सहशिक्षक अजित जोशी यांनी स्व.सुरेश म्हात्रे यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.