ब्रिटिश काळापासुन पोलिस मानवंदना देण्याची परंपरा! रोहयाचे ग्रामदैवत श्री. धाविर महाराज देवघटी बसले!

Share Now

460 Views

रोहा (प्रतिनिधी ) देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगड वासियांचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज सोमवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले आणी महाराजांच्या नवरात्रोत्सवास मोठया उत्सात प्रारंभ झाले. रोहा शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे.

“हे धाविर महाराजा समस्त रोहावासिय ग्रामस्थांनी श्रध्देने आणि पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे”, “या उत्सवामध्ये आमच्या हातुन चांगली सेवा होईल.. काही चुका सुध्दा होतील, पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे” तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव असे देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी श्री धाविर देवस्थानचे विश्वस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणी शेकडो धाविरभक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गारहाणे मांडले आणी अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी गोंधळयांची आरती, “विविध वाद्य” आणि घंटानादाने आसंमंत दुमदुमून टाकणाऱ्यां मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली.

यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, सरचिटणीस भुषण भादेकर, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, आप्पा देशमुख, सुभाष राजे, समीर सकपाळ, प्रकाश पवार, महेश सरदार, संदीप सरफळे, अमित उकडे, शैलेश रावकर, निलेश शिर्के, रवींद्र चाळके, सूर्यकांत कोलाटकर, प्रकाश पाटणकर, दत्ता जगताप, चंद्रकांत पार्टे, सचिन चाळके, अजित मोरे, रमेश साळवी, भालचंद्र पवार आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार अनिल तटकरे यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाराजांचे दर्शन घेतले.

————-
चौकटीत

— आकर्षक सजावट आणि रांगोळी —

या उत्सवानिमित्त मंदिराचा परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.. सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले असून मंदिरात प्रवेश द्वार, रांगोळी व फुलांची आरास आकर्षक अशी करण्यात आली आहे.

— सर्व आळींना प्रहराचा बहूमान —

श्री.धाविर महाराजांचा नवरात्रोत्सव अतिशय भक्तिमय व जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये उत्सव साजरा होतो. दर रात्री शहरातील प्रत्येक आळीला प्रहराचे जागरण करण्याचा बहूमान असतो. नवरात्री दरम्यान असंख्य भक्तगणांची पाऊले रोहयाकडे वळतात, लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात, सकाळ, सायंकाळ व रात्री 12 वाजताच्या आरतीलाही मंदिरात प्रचंड गर्दी होते.

— महाराजांचा पालखी सोहळा —

अपुर्व अशा उत्साहामध्ये सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायगड पोलिसांच्या मानवंदने नंतर निघणाऱ्यां महाराजांच्या पालखी सोहळयाने संपन्न होणार आहे. महाराजांचा पालखी सोहळा अभूतपूर्व व सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असाच असतो. शहरल प्रत्येक आळीमध्ये जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत केल जाते. शहरात सर्वांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी मंदिरात पोहचते. श्री धाविर देवस्थान नवरात्र उत्सव समिति व ट्रस्ट चे पदाधिकारी आणि रोहेकर नागरिक व भक्तगण पालखी सोहळयासाठी परिश्रम घेतात. महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे रोहा – अष्टमीकरांचा कौटुंबिक धार्मिक सोहळाच मानला जातो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *