राष्ट्रीय कार्यशाळेत धुतुम ग्रामपंचायतीचा गौरव

Share Now

259 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग ह्यांच्या वतीने पुणे चिंचवड येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGS) संकल्पना ध्येयांवर स्वच्छ (CLEAN) पंचायत व जलयुक्त ( WATER SUFFICIENT) पंचायत ह्या विषयावर राष्ट्रीय कार्य शाळा घेण्यात आली. त्यावेळी २८ राज्यांनी ह्या कार्य शाळेत सहभाग घेतला होता या राष्ट्रीय कार्यशाळेला महाराष्ट्र राज्यातून सहभाग घेण्याची सुवर्ण संधी धुतुम ग्रामपंचायतीला मिळाली. धुतुम ग्रामपंचायतीने घन कचरा व्यवस्थापन (ZERO GARBAGE) प्रकल्पच्या माध्यमातून केलेल्या स्वच्छतेच्या कामाची VIDEO FILM ह्या कार्य शाळेमध्ये दाखविण्यात आली. त्याची दखल केंद्र शासनाने त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने घेतली व धुतुम ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा शरद ठाकूर, शरद धावजी ठाकूर (उपसरपंच) व सदस्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. या राष्ट्रीय कार्यशाळेला धुतूम ग्रामपंचायतीच्या वतीने विनोद कृष्णा मोरे (ग्रामसेवक) ह्यांनी सहभाग घेतला व त्यांना या कामा करिता सन्मानित करण्यात आले. हा प्रकल्प यशस्वी करण्या करिता आय ओ टि एल कंपनी (IOTL ) चा सर्वात मोठा सहभाग लाभला तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) श्री. भालेराव , उरण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. भोये, विस्तार अधिकारी (ग्रा.प) नारंगिकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *