श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्था आधुनिक सुविधेने जोडणार ; किशोर जैन

Share Now

258 Views

नागोठणे (याकुब सय्यद) सर्वांच्या सहकार्याने श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेच्या स्थापना पासून ऑडिट अ वर्ग मिळत असून आमची सभासद,
भागभांडवळ, निधी, ठेवी, कर्ज व गुंतवणूक कमालीने वाढली असल्याने आम्ही ग्राहकांना एनईएफटी, आरटीजीएस व क्यूआर कोड (NEFT & RTGS व QR Code) सह मोबाईल बँकिंग या सारख्या अत्याधुनिक पध्दतीच्या सुविधेने श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेला जोडणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी आयोजित
पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री जोगेश्वरी मर्चन्ट सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष किशोर जैन बोलत होते.
तसेच संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २८ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी यावेळी दिली.
अधिक माहिती देताना किशोर जैन म्हणाले की, शहरात तीन ते चार पतसंस्था कार्यरत असून आम्ही सुरुवातीपासून सर्व संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्याने अविरत सेवा देत आहोत. संस्थेत कोणतेही राजकारण न करता अडचणीत आलेल्या माणसाला लगेच कर्ज देत असतो. कर्ज घेणार्‍यांच्या भावना चांगल्या व ते आमचे हितचिंतक असल्याने वसूली सुलभ असते. संस्था संचालक व कर्मचारी एक विचाराने चांगल्या हेतूने व माणुसकीच्या आधारावर चालत आहे. कर्मचारी जगला पाहिजे या हेतूने आम्ही येथील कर्मचार्‍यांच्या कुटुंबिक समस्या लक्षात घेत असल्याने तेही आंनदी आहेत. तसेच सर्व बाबतीत आम्ही स्थानिकांना प्राधान्य देत असतो. त्यांनीही त्याचा फायदा घेत आपले व्यवसाय उद्योग वाढविले पाहिजे.
ग्राहकांना एनईएफटी, आरटीजीएस व क्यूआर कोड (NEFT & RTGS व QR Code) सह मोबाईल बँकिंग या सारख्या अत्याधुनिक पध्दतीच्या सुविधा पुरविणार असल्याने त्याची माहिती व ट्रेनिंग कर्मचार्‍यांना देणार असल्याचे सांगितले.

सचिव संजय काकडे यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक असल्याने ती प्रगतिपथावर असून यावर्षी सभासद संख्येत 371 ने वाढ, भागभांडवल 2.75 लाखाने वाढ,,निधि 27.59 लाखाने वाढ,ठेवी 01.32 कोटीने वाढ, सभासद कर्ज 01 कोटीने वाढ व गुंतवणूकीत 41 लाखाने वाढ झाली असल्याचे सांगून संस्थेत नवीन प्रणालीनुसार सुविधा देणार असल्याची माहिती काकडे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश जैन,संचालक मिलिंद धात्रक, रितेश दोशी, व्यवस्थापक सुनील नावले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *