ताराबंदर येथे महाकाय अजगरास जीवनदान

Share Now

738 Views

मुरूड (अमोलकुमार जैन)
साप म्हटले की, मनात भीती निर्माण होते, मग तो वीतभर असो की दोनहात. शेवटी तो सापच. पण, महाकाळवासियांनी अजरासारख्या महाकाय सापाला जीवदान देऊन भूतदयेचा संदेश मुरूड तालुक्यातील राजा मकाजी यांनी दिला आहे.

बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे ताराबंदर(नवी बोर्ली) येथील राजा मकाजी यांच्या घराच्या मागे मोठ्या प्रमाणात आमराई आहे. त्याचप्रमाणे गावाला लागून फणसाड अभयारण्य देखील आहे. आमराईमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी असतात.पावसापासून आसरा आणि खाण्यास काही मिळावे या हेतूने हे प्राणी मानव वस्तीमध्ये येत असतात.आज सकाळी साडे सातच्या सुमारास ताराबंदर येथील राजा मकाजी यांच्या घरात अजगर घुसून बसला होता.तब्बल साडे नऊ फुट लांबीचा अजगर गुंडाळी मारून बसलेला दिसला. राजा मकाजी यांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीचा दखल घेत त्या अजगरास मोठ्या शिताफीने पकडला अन त्यास सर्पमित्र दृश्यनंत झावरे यास जंगलात सोडण्यासाठी ताब्यात दिले.राजा मकाजी यांच्या घरात गेल्यावर्षी सुद्धा अजगर शिरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *