अमेया यार्ड मध्ये कलमारला आग.

Share Now

315 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील बांधपाडा( खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या अमेया यार्ड मधिल कलमार ला आग लागण्याची घटना गुरुवारी ( दि२९) सकाळच्या सुमारास घडली आहे.या आगीत ३ कोटी रुपये किंमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जेएनपीए बंदरातून देश परदेशात आयात- निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक हि बांधपाडा( खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अमेया यार्ड मध्ये केली जाते.मालानी भरलेला कंटेनर हा ट्रेलरवर ठेवण्याचे काम हे यार्ड मधिल कलमार हे करत असतात.अशा या कलमारला शाँट सर्किटमुळे आग लागण्याची दुदैवी घटना गुरुवारी ( दि२९) रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.सदर आगीत कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.मात्र आग विझविण्याचे साधन तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने आगीत करोडो रुपये किंमतीचा कलमार भस्मसात पडला आहे.यासंदर्भात अमेया यार्ड चे वरिष्ठ अधिकारी राहिल निगम यांच्याकडे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *