नागोठणे विभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आ. रविंद्र पाटील

Share Now

271 Views

नागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे पंचक्रोशीतील जनता ही माझ्या जिवाभावातील असून विशेषता नागोठणे पंचक्रोशीतील जनतेवर माझे मनापासून प्रेम आहे. त्यामुळे नागोठणे विभागावर विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. केंद्रात व महाराष्ट्र राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे नागोठणे विभागाचा विकासात्मक काम माध्यमातून कायापालट करणार असे आत्मविश्वास आ. रविंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

पाली पेण सुधागड मतदारसंघाचे कार्यसम्राट आ. रविंद्र पाटील यांच्या आमदार फंडातून गांधी चौक ते राजा गुरवच्या घरा समोरील रस्ता तोच शृंगारतळा मार्ग गावाचे बाहेर 66 राष्ट्रीय महामार्गावर जाणारा रस्ता मंजुरीचा पत्र त्याचबरोबर चालक-मालक कल्याणकारी मिनीडोर संस्था रिक्षा स्टॅन्ड शेड व कार्यालयाचे मंजुरी पत्र आ. रविंद्र पाटील यांनी नागोठणे भाजप कार्यकर्ते व चालक-मालक संस्थेचे पदाधिकारी यांना दिले. यावेळी विकासकामांवर चर्चा करत आ. रविंद्र पाटील बोलत होते.

यावेळी भाजप रायगड माजी उपजिल्हाध्यक्ष किशोर म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, ऐनघर उपसरपंच संतोष लाड, राजा गुरव, अजीम बुबेरे,जनार्दन कदम, संदीप बलकवडे, नितेश भोय, शेखर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पेण सुधागड मतदारसंघाचे आ. रविंद्र पाटील पुढे म्हणाले की, भारताचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाची हर घर जल मिशन योजना मंजूर केली असून माझ्या मतदारसंघातील एकही ग्रामपंचायत या योजनेपासून वंचित राहणार नाही. आ. रविंद्र पाटील यांनी असाही विश्वासही यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *