पेण आर. टी.ओ. परिवहन समिती ची प्रथम सभा माणगांव येथील सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडीयम येथे संपन्न

Share Now

116 Views

मुरुड (संतोष हिरवे ) : सदर्भीय शासन परिपत्रक नियम क्र.5(2) मधील तरतुदीनुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षितपणे कशी करणे याबद्दल शालेय समितीची प्रथम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेण आर. टी ओ. ईन्स्पेक्टर उचगावकर साहेब, पेण आर. टी. ओ. ईन्स्पेक्टर नंदन राऊत साहेब, माणगांव उपपोलीस निरीक्षक गायकवाड साहेब, माणगांव पोलीस राम डोईफोडे, माणगांव वाहतूक शाखेचे अंमलदार दिपक शेरकर साहेब, माणगांव शिक्षण केंद्र प्रमुख सुरेश म्हात्रे, माणगांव शिक्षण केंद्र प्रमुख ओव्हाळ साहेब, सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडियम स्कूल प्रिन्सिपल मनीषा मोरे मॅडम,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ चे माणगांव तालुका पत्रकार अद्यक्ष सचिन पवार त्याच प्रमाणे माणगांव तालुका बस युनियन अद्यक्ष,व बस चालक मालक, शालेय बस समितीचे अध्यक्ष असलेले मुख्याध्यापक, पालक शिक्षक संघचा प्रतिनिधी शालेय बसचे कत्राटधार धाराचा प्रतिनिधी असे या सभेला उपस्थित होते.

माणगांव शिक्षण प्रसारक मंडळच्या सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल येथे आयोजीत केलेल्या माणगांव तालुक्यातील सर्व शालेय स्कूल समितीची प्रथम सभेचे पेण आर. टी. ओ. साहेबांनी मौलाचे मार्गदर्शन केले ततपूर्वी सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा मोरे मॅडम यांनी आलेल्या सर्व मान्यवराचे पुलगुच्छ देऊन स्वागत केले. पेण आर. टी. ओ. एन्स्पेक्टर नदंन राऊत साहेब यांनी सर्व माणगांव तालुक्यातील शालेय कमिटी ला आयोजीत केलेल्या विषयावर मार्गदर्शन केले. बसमध्ये येणाऱ्या सर्वच्या विद्यार्थीची यादी संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर रक्तगट इत्यादी माहिती अद्यायवत असणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले. बसची आवश्यक ती कागदपत्रे वेद्य असणे आवश्यक आहेत. बस वाहन चालवीनेच्या पाच वर्षाचा अनुभव असणे. बस चालू असताना पालकाचे चालकास मोबाईल वर बरेच फोन येत असतात त्यामुळे चालकाने मोबाईल वापरू नये असल्यास आपल्या सोबत असणारा मदतनीस यांच्याकडे द्यावा.

त्याचप्रमाणे बस असणारे आशनक्षमता पेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे टाळावे पालक स्वतः विद्यार्थीना शाळेत ने आण करतात त्या व्यतिरिक्त इतर खासगी सवगातील उदा. जीप, रिक्षा, मॅजिक, इको या सारख्या वाहनातुन विद्यार्थी वाहतूक होणार नाही याची काळजी शाळेने घेणे आवश्यक आहे. जरं का असं कोणी आढळून आल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार याची नोंद घ्यावी अशा पद्धतीने माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल मध्ये प्रथम सभेच्या परिवहन समिती मध्ये सांगण्यात आले अशा पद्धतीने पेण आर टी ओ उचगावकर साहेब, राऊत साहेब, माणगांव पोलीस उप निरीक्षक गायकवाड साहेब, माणगांव वाहतूक शाखेचे अंमलदार दिपक शेरकर व केंद्र प्रमुख ओव्हाळ, आणि म्हात्रे सर यांनी माणगांव तालुक्यातील स्कूल बस चालक मालक, शिक्षक प्रतिनिधी शालेय मुख्याधपिका, तसेच पालक वर्गाना सूचना दिल्या या कार्यक्रमांची सांगता सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल च्या प्रिन्सिपल सौ. मनीषा मोरे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.