रोहा एसटी स्थानकातील मलमूत्र सांडपाणी टाकी फुल्ल, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

Share Now

703 Views

रोहा (श्याम लोखंडे) रोहा तालुक्याच्या ठिकाणी असलेले अद्ययावत रोहा एसटी स्थानकातील स्वच्छता ग्रहाची वाताहत झाली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यातच सार्वत्रिक शौचालय अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. तर आता मलमूत्र सांडपाणी टाकी फुल्ल झाल्याने ती भरून त्यातील दुर्गंधीयुक्त मैला एसटी स्थानकाच्या आवारात रस्त्यावर आले. त्यामुळे प्रवाश्याचे आरोग्य धोक्यात आले आहे गेली तीन चार दिवस पावसाच्या पाण्यात हे पाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधीचे पसरले आहे

रोहा तालुक्यात असलेले एकमेव बस स्थानक खासगीकरणातून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेला आहे. या बस स्थानकात प्रवाश्यांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृह बांधले आहे. या स्वच्छतागृहाचा वापर प्रवाश्यांसह एसटी स्थानकातील व्यापारी संकुलनातील व्यापारी वापर करीत असतात. स्वच्छता गृहाची टाकी मलमूत्राणी फुल्ल झाली असून त्यातील मैला बाहेर पडून एसटी स्थानकाच्या आवारात येत आहे. तसेच आवरालगत असलेले बायपास रस्त्यावर देखील आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

रोहा बस स्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहाची टाकी फुल्ल झाल्याची तक्रार मिळताच नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी दखल घेत नगरसेवक मजित पठाण न.प.आरोग्य निरिक्षक निवास पाटील यांनी ठेकेदार व महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत स्वच्छता करण्यास सांगितले. एसटी अधिकारी पाटील, धोत्रे, गायकवाड यांनी ठेकेदारास ताबडतोब सफाई करण्यास सांगितले व मलमूत्र मैलाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. मैला उघड्यावर आला असल्याने गेली तीन दिवस संबंधित ठेकेदाराला हे स्वच्छ करण्यास सांगत आहोत परंतु संबंधित ठेकेदारांनी कानाडोळा केले. असे वाहतुक नियंत्रक यांच्याकडून कळविण्यात आले. रोहा बस स्थानकातील हा परिसर त्वरित स्वच्छ करण्याची गरज असून हे न केल्यास प्रवाश्याचे आरोग्य धोक्यात येणार आहे. पावसाळा सुरु असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *