नागोठणे शहर काँग्रेस पक्ष नवनिर्वाचित कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या

Share Now

266 Views

नागोठणे : ( याकूब सय्यद ) काँग्रेस पक्षाचे नेते राहुल जी गांधी यांनी संपूर्ण भारत देशात तरुणांमध्ये दिसत असलेली बेरोजगारी व महागाई त्याचबरोबर जातीपातीचे गलिच्छ राजकारणा विरुद्ध भारत जोडो पद यात्रेची सुरुवात केली असून त्या भारत जोडो पद यात्रेला मोठा प्रतिसाद गावोगावी राहुलजी गांधी यांना मिळत आहे त्यामुळे संपूर्ण भारतात काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे तरूण नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची खूप मोठी अशी पक्ष प्रवेशानी फळी तयार होत आहे. भारत जोडो या पद यात्रेचा जोर सर्वत्र दिसत असून रायगड जिल्ह्यामधील प्रत्येक शहर व गावांमध्ये भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. केंद्रात व राज्यात भाजप पक्षाची सत्ता असल्याने संपूर्ण भारतात महागाईचा कहर दिसून येत आहे. तरुण पिढी देशोधडीला लागलेला दिसत आहे. जातपातीचे राजकारण भारतात पाहाव्यास मिळत आहे. अशी गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या राहुल जी गांधी भारत जोडो पदयात्रेचा प्रवास करीत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी सुगीचे दिवस पाहायचे असतील तर भाजप सत्ता पालट करणे कालाची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस आय पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणून जनता राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद देत आहे. त्याच अनुषंगाने रोहा तालुक्यातील नागोठणे शहरातील नवनिर्वाचित तरुण पिढी हे देखील नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आय पक्षामध्ये जाहीर प्रवेश करीत राहुल जी गांधी यांचे भारत जोडो स्वप्नाला साकार करण्यासाठी व पक्ष संघटना बळकटीकरण करण्यासाठी पुढे सरसावली आहे. भारत जोडो यात्रेला खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी व पुन्हा देशात काँग्रेस आय पक्षाची सत्ता यावी म्हणून रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या निवासस्थानी व शेलघर गावी नागोठणे शहरातील नवनिर्वाचित तरुणांनी व मुस्लिम महिलांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत पद देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्षा पदी माजी सरपंच निलोफर पानसरे नागोठणे काँग्रेस महिला शहराध्यक्षा पदी शबाना असिफ मुल्ला शहनाज खुर्शीद अधिकारी नागोठणे काँग्रेस महिला उपाध्यक्षा इरम इकबाल पानसरे काँग्रेस महिला उपाध्यक्षा निकहत कय्युम मुजावर नागोठणे काँग्रेस शहर सरचिटणीस शगुप्ता वाजीद टोलकर नागोठणे काँग्रेस महिला शहर सरचिटणीस आफरीन दानिश अधिकारी नागोठणे काँग्रेस युवती शहर अध्यक्ष तरूण युवक तस्सवूर अ.वहाब अधिकारी रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाअध्यक्ष आदिल शब्बीर पानसरे सरचिटणीस पेन विधानसभा युवक काँग्रेस सरफराज रफिक हाफिज सरचिटणीस पेन विधानसभा युवक काँग्रेस फैयाज रहमान पानसरे नागोठणे काँग्रेस शहर युवक अध्यक्ष नसीम नुर मोहम्मद इलामी रोहा तालुका काँग्रेस युवक उपाध्यक्ष नागोठणे शहर काँग्रेस आय पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते देण्यात आले.

त्यावेळी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर महीला जिल्हाध्यक्ष एडवोकेट श्रद्धा ठाकूर डॉक्टर मोईन शेख रायगड जिल्हा युवा अध्यक्ष ढवळे जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे अल्पसंख्याक समाज रोहा तालुका अध्यक्ष याकूब सय्यद युवा पेन काँग्रेस शहराध्यक्ष मोकल युवा कार्यकर्ते आसिफ मुल्ला मोंजीस नजीर अधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *