कोनायसन्स स्कुलच्या स्वरा पवारची राष्ट्रीय स्पर्धेत निवड, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत 1 गोल्ड, 1 सिल्व्हर व 11 ब्रॉंझ मेडलची कमाई

Share Now

64 Views

पेण : (देवा पेरवी) एनव्हीजी एज्युवेंचर्स फाउंडेशन पेणच्या कोनायसन्स स्कुलमधील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या स्वरा मंगेश पवार या विद्यार्थिनीची कन्याकुमारी येथे होणाऱ्या थांग-ता या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्कुलच्या विद्यार्थ्यांनी 1 गोल्ड, 1 सिल्व्हर व 11 ब्रॉंझ मेडल पटकाविले आहेत.

कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या 26 व्या राज्यस्तरिय थांग-ता स्पर्धेत पेणच्या कोनायसन्स स्कुलला दैदिप्यमान यश प्राप्त झाले असून या स्पर्धेत 1 गोल्ड, 1 सिल्व्हर व 11 ब्रॉंझ मेडलची कमाई झाली आहे. या स्पर्धेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या स्वरा मंगेश पवार हिने गोल्ड मेडल, विराज विशाल मोकल याने सिल्व्हर मेडल जिंकले असून दूर्वा देवा पेरवी, दिशा प्रकाश गुरव, युवराज शशिकांत भगत, यदर्थी योगेश पाटील, गायत्री सुशील कारखानीस, स्वरूपा महेश चौधरी, आयुष सुहास पाटील, राजविर योगेंद्र देशमुख, कुशल अनिल सिंग, पुष्कर गणेश म्हात्रे, निल धनंजय पाटील यांनी ब्राँझ मेडल पटकाविले आहेत. गोल्ड मेडल जिंकलेल्या स्वरा पवार या विद्यार्थीनीची कन्याकुमारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्कुल क्रीडा शिक्षक आदित्य तेरेदेसाई यांनी कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

वरील सर्व विद्यार्थ्यांचे एनव्हीजी एज्युवेंचर्स फाउंडेशनचे संचालक ऍड.मंगेश नेने, डॉ.मनीष वनगे, ऍड.तेजस्विनी नेने, डॉ.सोनाली वनगे, प्रकाश गुरव, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया विखणकर, क्रीडा शिक्षक आदित्य तेरेदेसाई व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे. तसेच स्वरा पवार या विद्यार्थिनीला कन्याकुमारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.