वावेदिवाळी इंदापुर : (गौतम जाधव) तळा बाजारपेठेत एस टी स्टँडच्या पाठीमागे राजरोसपणे अवैध मटका सुरु असून याकडे तळा पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे. तळा शहराचा विकास झपाट्याने होत असून या शहरात माञ अवैध धंद्याना ऊत आला आहे. पैशाच्या अमिषाला भुलून अनेक गरीब कुटुंब उद्धवस्त होत असून पोलिस यञनेचे जानुन बुजून दुर्लक्ष होत आहे.
याबाबतची माहिती तळा पोलीस ठाण्यात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी दिली असता या अवैध मटका धंदयावर कारवाई करून बंद करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही कोणतीच कारवाई या मटका धंद्यावर होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना काळात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली असून काही लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या आहेत. त्यामुळे गावाकडे रोजमदारीवर काम करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु पैशाच्या लोभामुळे बरेच लोक कमीवेळात जास्त पैसा मिळत असल्यामुळे या अवैध धंद्याकडे वळले असून कल्याण, मेन, डे महाराष्ट्र यावर आकडे, पाना लावून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रिजल्टची वाट पाहत असतात.या मध्ये पुरूषां बरोबर महिलाचा ही मोठा सहभाग दिसत आहे.
हे मटका खेळणारे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोक दिवस भर मोलमजुरी करून सध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील या आशेने मटका खेळून पैशाची बरबादी करून कुटुंब उध्दवस्त करीत आहेत.मटका खेळणा-या काही जणांना कमिवेळात पैसा मिळत असल्यामुळे हा पैसा व्यसानाधिनतेकडे जात आहे त्यामुळे अनेक कुटूंब उध्दवस्त झाली आहेत.यामध्ये मटका चालक दिवसेन दिवस गब्बर होत असून मोलमजूरी करणारे माञ देशोधडीला लागले असून त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत भारताची भविष्य घडविणारी मुले उपाशी पोटी जगत आहेत. माणगांव पोलिसांनी ज्या पध्दतीने माणगांव शहरातील अवैध जुगार चालवणा-यावर कारवाई केली तशी कारवाई तळा पोलीसानी या अवैध मटका धंद्यावर त्वरित करून सर्वसामान्य गरीब जनतेचे कुटुंब वाचवावेत अशी जनतेतून मागणी होत आहे.