रोहा टाईम्स चे संपादक मनोज घोसाळकरयांच्या भगिनी मनीषा घोसाळकर-सावंत यांचे दु:खद निधन

Share Now

223 Views

रोहा (संतोष सातपुते ) रोहा टाईम्स चे संपादक मनोज घोसाळकर यांच्या भगिनी मनीषा घोसाळकर-सावंत यांचे गुरुवार दि.१०/११/२२ रोजी दीर्घ आजाराने अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे वयाच्या 44 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्या आपल्या घोसाळे पंचक्रोशीतील लेक आणि आरडीसी बँकेची कर्मचारी तसेच त्या पंचक्रोशीतील सर्वाना परिचयाचे व सुस्वभावी सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते त्या कुटुंबीयांचे ते आधारवड होत्या त्यांचा पश्चात मुलगी, जावई, भाऊ, बहिण, वहिनी, भाचे असा मोठा परिवार असून. त्यांच्या जाण्याने घोसाळकर व सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला घोसाळे ग्रामपंचायती चे सरपंच संतोष पार्टे, वाली ग्रामपंचायती चे सरपंच उद्देश देवघरकर, चंद्रकांत पार्टे, विनायक धामणे, किसन मोरे ,आर डि सी सी बॅकेचे कर्मचारी आणि घोसाळे गावातील ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते. यासह तालुक्यातील विविध स्तरांतील मान्यवर सहभागी झाले होते. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी हरिहरेश्वर येथे.आणि उत्तरक्रिया विधी सोमवार दि. २१.११.२०२२ रोजी निवासस्थानी घोसाळे येथे होतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *