वावेदिवाळी इंदापुर :(गौतम जाधव )माणगांव भर बाजारपेठेत वक्रतुंड हाँटेलमध्ये राजरोस पणे जूगार क्लब चालू असताना दि, ५ नोव्हेंबर रोजी माणगांव पोलिसांनी धाड टाकून एकूण ३९ जनानवर कारवाई केली होती. परंतु ती कारवाई खरीहोती की जनतेची दिशा भूल करणारी होती. कारण त्या नंतर पुन्हा दोनच दिवसात हा जुगार अड्डा वक्रतुंड हाँटेल मध्ये पुन्हा चालू करण्यात आला या क्लब चालकाला पोलिस खात्याची कुठल्याही प्रकारे भीती वाटत नाही. उलट हा छाती ठोक पणे सांगतो की मी खालपासून ते वरपर्त हप्ते देतो त्या मुले माझे कोणी वाकडे करू शकत नाही. मंगल वार दि.१५ नोव्हेंबर रोजी जिल्हाचे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा माणगांव मध्ये दौरा असता देखील हा जूगार क्लब आड्डा माञ तेजीत चालू होता. या संदर्भात माणगांव पी. आय राजेंद्र पाटील याच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. या भर बाजारपेठत वस्तीच्या ठिकाणी चालू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक पोलिस किवा रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक हा जुगार आड्डा चालू ठेवणार की कायमचा बंद करणार या कडे आता माणगांवकराचे लक्ष लागून राहिले आहे.
माणगांव वक्रतुंड हाँटेल मध्ये जूगार क्लब सुरू, जिल्हाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी माणगांवात असताना सुध्दा जुगार अड्डा तेजीत…..?

332 Views