नागोठणे सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा हडप करणारी व्यक्ती कोण ? शासनाच्या कोणत्या कार्यालयीन अधिकाऱ्यांचा त्याला वरदस्त

Share Now

807 Views

नागोठणे (याकुब सय्यद) रायगड जिल्हयातील नागोठणे येथे शासकीय सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचबरोबर पूर्वीचा जुना कारखाना इंडियन पेट्रोल केमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड व सध्याचा रिलायन्स इंडस्ट्रीज कारखाना या कारखान्याच्या अखत्यारीत येत असणारी मोठी स्वरूपाची खुली जागा आहे. त्या जागेत मोठा धनदांडगा व्यक्ती शासकीय कोणत्याही कार्यालयाची पूर्ण परवानगी न घेता बेकायदेशीरपने मनमानी पद्धतीने करोडो कृपयाचा अंदाजे बांधकाम करताना स्थानिक मुस्लिम ग्रामस्थांना नजरेत दिसताच त्या लोकांनी दिनांक 11/ 10/ 2022 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था नागोठणे ग्रामपंचायत, नागोठणे पोलीस ठाणे, रोहा तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती रोहा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग, रायगड जिल्हा अधिकारी अलिबाग असे सर्व शासकीय कार्यालयीत लेखी तक्रार अर्ज दिले होते. परंतु त्या लेखी तक्रारी अर्जावर अध्यापपर्यंत कोणत्याही शासकीय कार्यालयांकडून अधिकाऱ्यांनी कायदेशीर ठोस कारवाई केली नाही असे दिसत आहे. नागोठणे या गावात शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाची खुली जागा हडप करणारी व्यक्ती कोण ? बेकायदेशीर काम करत असलेल्या त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई का होत नाही ? संबंधीत व्यक्तीने कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता शासकीय कार्यालयीन अधिकाऱ्यांची कोणतीही भीती न बाळगता पुन्हा त्याच जागी बांधकामास जोरदार सुरुवात केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेच्या परिसराजवळ असणारे मुस्लिम धर्मियांचे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागरूक वली अवलिया हजरत सय्यद मीरा मोहिद्दीन शाँह बाबांची दर्गा ही जिल्ह्यामध्ये सर्वांना प्रचलित आहे. त्या दर्गाचा सालाबादप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये होणारे हिंदू मुस्लिम भाविकांचे भव्यदिव्य उरूस (जत्रा ) ही दोन दिवस रात्रदिवस हजारोंच्या संख्येने होत असते. त्या ठिकाणी मोठमोठे खेळणी दुकाने मोठमोठे आकाश पाळणे मोतचा कुवाँ खेळ असे अनेक छोटे मोठे दुकाने त्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे येत असतात त्या दर्गा परिसरा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करणारे धन दांडगा व्यक्ती ही सालाबाद प्रमाणे होणारे उरुस (जत्रेला) बाधा पोचवण्याचा काम करून तमाम मुस्लिम बांधवांचे मन दुखावण्याचे कारस्थान रचत आहे. सणासुदीला खो घालण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी बेकायदेशीरित्या शासकीय कोणती परवानगी न घेता धनदांडगा व्यक्ती ही कोण आहे याचा शोध घेऊन संबंधित खात्याच्या कार्यालयातून अधिकाऱ्यांनी कठोर कायदेशीर त्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा मुस्लिम समाज नागोठणे तर्फे जनआंदोलनचा हत्यार उपसला जाईल असे नागोठणेतील मुस्लिम समाजाकडून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *