उरण (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील प्रसिद्ध व नामवंत असलेल्या कुंभारवाडा रोड, श्री स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या स्व.रामदासजी दगडुजी बुंदे शिक्षण संस्था उरण रायगड या संस्थेचे लिटिल हार्ट्स प्री स्कुल मध्ये कम्युनिटी हेल्पर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा कार्याध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे उपस्थित होते.
यावेळी लहान विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोशाख परिधान केले होते.वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, सैनिक, धोबी, शेतकरी, कोळी असे विविध पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी कविता, गोष्टी आपल्या शब्दात सांगितल्या. समाजात प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते. प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक उद्योग धंदे एकमेकांना पूरक आहेत. मनुष्य एकमेकांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही. एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी मनुष्याला सर्वच क्षेत्रातील व्यक्तीची मदत घ्यावी लागते. हिच संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी कॅम्युनिटी हेल्पर डेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लिटिल हार्ट्स प्री स्कूल च्या प्राचार्य सोनाली धीरज बुंदे व संस्थेचे सचिव धीरज रामदासजी बुंदे यांनी सांगितले.