खराब रस्ते,अनधिकृत पार्किंग,तासंतास ट्राफिक, या रोजच्या त्रास देणाऱ्या समस्या महत्वाच्या आहेत की नेत्यांना त्यांची भागीदारी,हे मूलभूत प्रश्न सुटणार कधी?

Share Now

235 Views

उरण : ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात JNPT (JNPA ) बंदर स्थापन होऊन अनेक वर्षे झाली.उरण तालुक्यातील प्रत्येक विभागात प्रत्येक गावाशेजारी CFS व कंटेनर यार्ड तसेच छोटेमोठे गोडाऊन सुद्धा अस्तित्वात आले.पण हे CFS आणि कंटेनर यार्ड ज्या विभागात आणि गावाशेजारी अस्तित्वात आहेत त्या गावातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी यांना हाताशी घेऊन कुठल्याही उपाययोजना न करता,नियोजन शून्य कारभारामुळे उरण मधील सामान्य जनतेला रोजचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रत्येक विभागात असलेल्या CFS आणि कंटेनर यार्ड मध्ये त्याच विभागातील स्वयंघोषित नेत्यांचे भागीदारी नाहीतर मोबदला असल्यामुळे, या समस्या कधीच न सुटणाऱ्या झाल्या आहेत. याच यांच्या भागीदारी मुळे JNPT(JNPA )बंदराच्या स्थापनेपासून उरण तालुक्यातील विभागातील अनेक तरुणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.आणि यामध्ये खराब रस्ते आणि अनधिकृत पार्किंग जिम्मेदार असल्याचे निदर्शनास आले आहे. दिघोडे ते दास्तान फाटा तसेच दिघोडे ते गव्हाण फाटा या रस्त्याने प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण असे चित्र झाले आहे. ही तासंतास होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातात जाणारा जीव याचा त्रास फक्त उरण च्या सामान्य जनतेला होणार आहे.पण याने काहीच फरक उरण तालुक्यातील स्वयंघोषित पुढारी आणि कार्यसम्राट नेत्यांना होणार नाही. कारण त्यांच्या आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानेच या समस्या आपल्याला सहन कराव्या लागत आहेत असे चित्र स्पष्ट दिसत आहे. या रोजच्या ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग चे प्रश्न जर कधीच सुटणार नसतील तर या सर्व गोष्टीला जबाबदार असलेल्या पुढारी आणि अधिकारी यांना भविष्यात उरण ची जनता त्यांची योग्य ती जागा नक्की दाखवेल. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा उरण च्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.उरण तालुका २४ तास ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग च्या विळख्यात असून पण वाहतूक अधिकारी गप्प का ? वर्षानुवर्षे उरण मधील रस्त्यांचे काम करून ठेकेदार मालामाल आणि उरण च्या जनतेचे मात्र हाल झाले आहेत.प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा जनता कायदा हातात घेईल. अजून किती वर्ष आम्ही ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग मध्ये मरत-मरत जगायचे असा प्रश्न उरण च्या जनतेमधून विचारला जात आहे.

कोट (चौकट ):-
“उरण च्या जनतेला खराब रस्ते आणि अनधिकृत पार्किंग मुले मरणाच्या दारात ढकलून त्या बदल्यात CFS आणि कंटेनर यार्ड मधून आर्थिक मोबदला आणि भागीदारी घेत असलेल्या नेत्यांचा तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध”
– कु.अजित कृष्णा म्हात्रे
(उपोषण सम्राट-उरण)

“तासंतास लागणारी ट्राफिक आणि खराब रस्ते यामुळे जो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याला जिम्मेदार असलेल्यांवर कारवाई का होत नाही,असे खूप दिवस चालल्यास जनता कायदा हातात घेईल”
– श्री.राजेश पाटील
(रायगड भूषण)

“उरण मध्ये ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग ची समस्या खूप वर्षानुवर्ष चालू आहे, पण आत्ता ही समस्या खूप मोठी झाली आहे, यावर उपाययोजना नाही झाल्या तर परिस्थिती हाताबाहेर जाईल”
– राजेंद्र भगत
(सामाजिक कार्यकर्ते ,निवेदक)

“उरण च्या जनतेला कोण वाली आहे का नाही? आयुष्यभर ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग चा त्रास सहन करायचा का आम्ही?”
– कु. निशिकांत म्हात्रे
(दिघोडे-उरण)

“आमच्यासारख्या अजून किती तरुणांचा जीव घेणार आहे, ही ट्राफिक आणि अनधिकृत पार्किंग, प्रशासन व वाहतूक अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत का ?”
– श्री.आदित्य मढवी
(चिरले-उरण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *