राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप नेते त्रिवंदी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक,रोह्यात जोडो मारो आंदोलन

Share Now

382 Views

धाटाव (जितेंद्र जाधव) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्य विधान केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. रोहा तालुक्यातील ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांचा नेतृत्वाखाली सोमवार दिनांक ( 21 ) रोजी राम मारुती चौक येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमात भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत असे वादग्रस्त विधान केले होते. त्याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी रोहा तालुका ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीने राज्यपालांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाकडून एवढी माणसे कशाला कोशारीच्या मयताला , भाजपाने पाळलेल्या कुत्र्याचे करायचे काय खाली डोकं वरती पाय,अरे नीम का पत्ता कडवा है कोशारी म्हातारा भडवा है, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी आक्षेपार्य विधान केल्याबद्दल शिवसेना रोहा शहर व तालुका वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत तसेच राज्यपाल हे सतत महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दल वादग्रस्त असे विधाने करत आहेत त्यामुळे राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा व आम्हा सर्वांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहा तालुका शिवसेनाप्रमुख समीर शेंडगे यांनी केले आहे.

यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेंडगे, रोहा शहर प्रमुख दीपक तेंडुलकर,राजेश कापरे, संतोष खेरटकर,निलेश वारंगे, मनोज लांजेकर अनिष शिंदे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *