किहीम ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा थळे पद बाद:-विभागीय आयुक्त यांचे आदेश

Share Now

262 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील किहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा संकेत थळे यांना सरपंचपदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा थळे यांनी कागदपत्रामध्ये खाडाखोड करणे, पेशाची अफरातफर, फसवणूक असे गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सरपंच व सदस्य यांना दोषी घोषित करून सर्वाना बडतर्फ करून प्रशासक नेमण्यात यावा. ग्रामपंचायतीचा निधी अपहार झालेला सर्व पैसा हा सामनेवाला यांचेडून दंडासह वसुल करून ग्रामनिधीमध्ये जमा करण्याचा हुकुम करण्यात यावा तसेच गैरव्यवहारात सामनेवाले यांचेसोबत संगनमत केल्यामुळे अर्जात नमूद केलेल्या कामाचे जे ठेकेदार आहेत त्यांना ग्रामपंचायत हद्दीतील काळ्या यादीत नावे घोषित करण्याची मागणी चोंढी येथील ऍड.कांचन प्रशांत नार्वेकर सहित पाच जणांनी तक्रार अर्ज दाखल केले होते.

अॅड. कांचन प्रशांत नार्वेकर व इतर पाच जणांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अलिबाग यांच्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी किहीम सरपंच सीमा संकेत थळे यांनी ग्रामपंचायत कामकाजामध्ये अनियमितता व कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत असल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रं. ३) कलम ३९ (१) अन्वये कारवाई प्रस्तावित करणेबाबत कळविले आहे. सदर प्रकरणी अधिनियमातील तरतुदीनुसार रितसर चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांना दि.०४.१०.२०२१ रोजी आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी दि. १३.१२.२०२१ व दि. १३.०६.२०२२ रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर केला आहे.

सदर प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी संबंधीतांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी दि.१५.०२.२०२२, दि. २४.०५.२०२२, दि.११.१०.२०२२ व दि.१०.११.२०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), जिल्हा परिषद रायगड, सहा.गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अलिबाग व विदयमान व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रापं किहीम है उपस्थित होते. तसेच अर्जदार कांचन प्रशांत नार्वेकर, वकील व इतर, मु. पो. चोंढी, किहीम, ता. अलिबाग, जि. रायगड व गैरअर्जदाराच्या वतीने अँड प्रशांत राउळ हे उपस्थित होते.

सरपंच सीमा संकेत थळे यांनी सांगितले की,पे अॅन्ड पार्क येथील कामाच्या नोंदीसाठी ग्रामपंचायतीला नोंदणी रजिस्टर ठेवणे ही जबाबदारी ग्रामसेवकाची असून त्याचे ते कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीचे कार्यालयाचे छत दुरूस्तीचे कामाचे समेत ठराव घेणे हे ग्रामसेवकाची जबाबदारी आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील दि.१३.१२.२०११ रोजीच्या अहवालात नमूद केले आहे. किहीम आदीवासी वाडी रोडच्या कासामध्ये झालेल्या अनियमिततेस ग्रामसेवक हा जबाबदार व्यक्ती आहे. मासिक सभेच्या.. इतिवृत्ताची पाने कोरी ठेवणे, सभेला उपस्थित नसलेल्या सदस्यांची नावे अदयावत ठेवणे हे ग्रामसेवकाचे काम आहे. सदर मुद्दयामधील जबाबदारी ही ग्रामसेवक यांची असुन त्यास ग्रामसेवक हे जबाबदार असताना सरपंच म्हणून जबाबदारी माझी नसल्याचे सरपंच थळे यांनी स्पष्ट केले आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास कामांना मासिक सभेत कामनिहाय मान्यता न घेता पुर्ण महिन्याची बाब निहाय मान्यता घेणेत आलेली आहे,सेल्फ चेकने रक्कमा बँकेतून काढून रोख खर्च करणे अशा प्रकारच्या अनियमितता केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. काम क्रमांक ६ पन्हाकडील रस्ता भाग २ हे काम चौदावा वित्त आयोग अंतर्गत घेतलेले होते. सदरचे काम पुर्ण झालेले आहे. या कामाचे पेमेंट प्रमाणक क्रमांक १०, दिनांक ०५/०८/२०२० अन्वये अदा केल्याचे दिसुन येते. मात्र सदर कामाचे देयकासाठी ठेकेदारास दिलेला चेक बँकेच्या खात्यातून वटलेला दिसत नाही,काम नंबर ३ या कामाचे झालेल्या खर्चास मासिक समेत मान्यता घेतलेली आहे.तसेच ठराव नंबर २०२/४ मध्ये खाडाखोड असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत कार्यालय छप्पर दुरुस्ती या कामासाठी बँक पासबुकाप्रमाणे रक्कम रू.४८,०००/-चेक क्र. २५८५२ अन्वये सेल्फचेक काढून मस्टरवरील एकुण १६ मजुरांना रक्कम अदा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहीता २०११ मधील नियम २४ (२५) च्या तरतूदीचा भंग करून आर्थिक अनियमितता केल्याचे स्पष्ट होत आहे.ग्रामपंचायतीने विकासकामे करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहीता २०९९ नियम ५६ च्या तरतूदीचा अवलंब केलेला दिसून येत नाही. मधील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३८ (२) क, कलम ५७ (३) व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील भाग-२ परिशिष्ट दोन नियम ११ (११) नुसार सरपंच यांनी आपली कर्तव्य पार पाडताना कर्तव्यात कसूर व अनियमितता केलेली आहे. या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.सदर सुनावणीच्या वेळी संबंधितांनी सादर केलेले कागदपत्र, ग्रामपंचायतीचे दस्तऐवज व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांचा फेर अहवालावरून निदर्शनास आल्या आहेत त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी किहीम ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा थळे पद बाद करण्याचे आदेश पारित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *